मायलेकाने होम क्वारंटाइनचा शिक्का पुसून केला रेल्वेनं प्रवास, आता प्रशासनाची उडाली झोप

मायलेकाने होम क्वारंटाइनचा शिक्का पुसून केला रेल्वेनं प्रवास, आता प्रशासनाची उडाली झोप

मुंबई विमानतळावर आरोग्य विभागानं हातावर मारलेला होम क्वारंटाइनचा शिक्का पुसून मुंबई-लखनऊ रेल्वे प्रवास केला होता.

  • Share this:

प्रशांत लीला रामदास, प्रतिनिधी

पिलभीत, 27 मार्च : देशभरात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ थांबायचं काही नाव घेत नाही. लोकांना घरी राहण्याचं आवाहन केलं जात आहे तरीही नियमांचं पालन केलं जात नसल्याचे प्रकार समोर आले आहे. आई आणि मुलाला होम क्वारंटाइन राहण्याची सूचना केली पण त्यांनी शिक्का पुसून प्रवास केला. आता हे मायलेक पॉझिटिव्ह आढळले आहे.

मुंबई विमानतळावर आरोग्य विभागानं हातावर मारलेला होम क्वारंटाइनचा शिक्का पुसून मुंबई-लखनऊ रेल्वे प्रवास करणाऱ्या मायलेकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं निष्पन्न झालं आहे.

हेही वाचा -पत्नीने अंघोळीसाठी सांगितलं तर पतीने केली आत्महत्या, कोरोनामुळे घडली घटना

त्यामुळे स्थानिक प्रशासनाची झोप उडाली आहे. या मायलेकरांच्या कुटुंबातील आणि संपर्कात आलेल्या लोकांची तपासणी करण्याचं काम हाती घेतलं आहे.

हा सर्व प्रकार उत्तर प्रदेशातील पिलभीतमध्ये घडला. ही महिला आणि तिचा मुलगा परदेशातून प्रवास करून आले होते. त्यानंतर मुंबई विमानतळावर त्यांची तपासणी केली असता त्यांच्या हातावर होम क्वारंटाइन राहण्याची सूचना केली होती. त्यानंतर त्यांनी रेल्वेनं मुंबई-लखनऊ असा प्रवास केला.

लखनऊ इथं पोहोचल्यावर वैद्यकीय तपासणी केली असता या महिलेला कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं. तसंच या महिलेसोबत आलेले इतर प्रवासीही संशयित आहे. त्यांनाही होम क्वारंटाइन राहण्याची सूचना देण्यात आली आहे.

डोंबिवलीतील तरुणाने केला असा प्रकार

दरम्यान, असाच एक प्रकार डोंबिवलीत घडला आहे.  डोंबिवलीत एका तरुणाला कोरोनाची लागण झाल्याची माहिती पुढे आली आहे. हा तरुण डोंबिवली पूर्वे भागात राहत असून तो तुर्कस्तान फिरायला गेला होता. तो मुबंई परत आल्यावर त्याला होम क्वारंटाइन राहण्यास सांगितलं होतं. मात्र, तसं असून सुद्धा तो एका लग्नात आणि हळदीमध्ये गेल्याची माहिती समोर आली आहे.

विशेष म्हणजे, त्याने आपल्याला कोरोना झाल्याची माहिती मेसेंजरवर आपल्या मित्रांना दिली आणि आपण दाखल झालो आहोत याची माहिती सुद्धा दिली.

हेही वाचा -कोरोनाशी लढा यशस्वी, कल्याणमधील 3 वर्षांच्या चिमुकलीनं केली महासंकटावर मात

हा तरुण कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यामुळे डोंबिवलीत एकच खळबळ उडाली होती. आता हा तरुण जिथे गेला तिथे पालिकेकडून फवारणी आणि तेथील नागरिकांची तपासणी चालू आहे, असं एका नगरसेवकाने नाव न प्रकाशित करण्याच्या अटीवर सांगितलं.

याबाबत कल्याण डोंबिवली महापालिकेच्या एका अधिकाऱ्यांने याला दुजोरा दिला आहे. मात्र, कॅमेऱ्यावर बोलण्यास नकार दिला.आधीही डोंबिवलीमधील एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याची माहिती पुढे आली आहे.

आता कल्याण-डोंबिवली कोरोनाग्रस्तांची संख्या 6 वर पोहोचली आहे. यातील 2 रुग्ण हे बरे झाले आहेत. त्यामुळे नागरिकांनी घरीच राहावे, असं आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

First published: March 27, 2020, 11:39 AM IST
Tags:

ताज्या बातम्या