संचारबंदी तोडूनही बीडच्या काकांची पुतण्यावरच आगपाखड, म्हणाले...

संचारबंदी तोडूनही बीडच्या काकांची पुतण्यावरच आगपाखड, म्हणाले...

संचारबंदी तोडण्यावरून क्षीरसागर काकांनी आपल्याच पुतण्यावरच टीकास्त्र सोडले आहे.

  • Share this:

बीड, 05 एप्रिल : महाराष्ट्रापुढे कोरोना व्हायरसचे संकट उभे ठाकले आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्य सरकारकडून बाहेर पडू नका, घरीच राहा, असे आवाहन केले जात आहे. परंतु, अशाही परिस्थितीत बीडमधील शिवसेनेचे माजी आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी संचारबंदीचे नियम तोडले. नियम तोडल्यामुळे क्षीरसागर यांच्यावर चोहीबाजून टीका झाली. परंतू, संचारबंदी तोडण्यावरून क्षीरसागर काकांनी आपल्याच पुतण्यावरच टीकास्त्र सोडले आहे.

माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी संचारबंदीचे उल्लंघन करत मुंबई ते बीड असा प्रवास केला, असा आक्षेप घेत राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी त्यांना होम क्वारंटाइन करण्याची मागणी केल्याने जिल्ह्यात एकच खळबळ माजली होती. याबद्दल जिल्हाधिकार्‍यांकडे पत्राद्वारे  तक्रारही करण्यात आली.

हेही वाचा - 62 वर्षीय नाहरु खान यांनी 48 तासांत बनवलेली सॅनिटायजेशन मशीन हॉस्पिटलला केली दान

मुळात  राज्यात सर्वत्र लॉकडाऊन, जिल्हाबंदी, सीमा बंदी, संचारबंदी, जमावबंदी असताना कुठली परवानगी न घेता शनिवारी जयदत्त क्षीरसागर आणि त्यांचे कुटुंब मुंबईहून बीड येथे खासगी वाहनाने आले. त्यांना कायद्याचं बंधन नाही का, सामान्यांना वेगळा न्याय आणि यांना वेगळा न्याय का, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.  आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी जयदत्त क्षीरसागर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना देण्यात आली आहे.

मात्र, 'मी मुंबई नव्हे तर औरंगाबाद येथून बीड जिल्ह्यात प्रवेश केला आहे.  हा प्रवास करण्यासाठी मी रीतसर परवानगी काढली होती', असा दावा जयदत्त क्षीरसागर यांनी केला.

हेही वाचा -पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर इंदुरीकर महाराजांनी लिहिलं पत्र, म्हणाले...

तसंच, 'एवढ्या खालच्या पातळीवर उथळपणे, बालिशपणे, आरोप करणे चुकीचे आहे. कोरोनाच्या मोठ्या संकटात परिवाराची आणि कुटुंबाची, जिल्हयाची काळजी घेणं गरजेचं  आहे. अशा परिस्थितीमध्ये कोरोनापेक्षा राजकारणाचा व्हायरस घातक ठरत आहे, कोरोना व्हायरस परतून लावता येईल. पण राजकारणाचा व्हायरस तसाच राहणारा आहे. हे न संपणारा आहे. आपत्कालीन परिस्थितीमध्ये राजकारण कारण चुकीचं आहे. सोबत येऊन परिस्थितीवर मात करायचे सोडून खालच्या पातळीचं राजकारण सुरू आहे, अशी टीकाही क्षीरसागर यांनी केली.

तसंच, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जनसेवा करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे, कालचा प्रकार हा बालिशपणाचे लक्षण आहेत, असा टोलाही संदीप क्षीरसागर यांचे नाव न घेता लगावला आहे.

First published: April 5, 2020, 3:58 PM IST
Tags:

ताज्या बातम्या