'त्या' पोस्टकडे दुर्लक्ष करणे व्हॉट्सअ‍ॅप अ‍ॅडमिनला पडले भारी, वाचा नेमकं काय घडलं?

'त्या' पोस्टकडे दुर्लक्ष करणे व्हॉट्सअ‍ॅप अ‍ॅडमिनला पडले भारी, वाचा नेमकं काय घडलं?

'सोशल मीडियावर कोरोनाबाबत चुकीची माहिती, आकडेवारी अथवा नागरिकांमध्ये घबराहट होईल अशी माहिती, फोटो अथवा व्हिडिओ तसेच समाजात तेढ निर्माण होईल'

  • Share this:

पिंपरी चिंचवड, 05 एप्रिल : कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहे. परंतु, काही महाभाग सोशल मीडियावर चुकीचे मेसेज शेअर करून वातावरण दुषित करण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु, कोरोनाबाबत आक्षेपार्ह पोस्टकडे दुर्लक्ष केल्या प्रकरणी व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप अ‍ॅडमिन विरुद्ध आणि ती पोस्ट टाकणाऱ्या व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिंपरी चिंचवडमध्ये हा प्रकार घडला आहे. सुशीलकुमार  खैरालिया  आणि अमित  भालेराव अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमित भालेराव हा 'अमित भालेराव मित्र परिवार' या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपचा अ‍ॅडमिन आहे. तर आरोपी सुशीलकुमार हा त्या ग्रुपचा सदस्य आहे.

हेही वाचा -  सलाम!250 किमी प्रवास करून रुग्णसेवा करण्यासाठी पोहोचली 8 महिन्यांची गर्भवती नर्स

आरोपी सुशीलकुमार याने त्या व्हॉट्‌सअ‍ॅप ग्रुपवर विशिष्ट धर्माच्या नागरिकांकडून काही साहित्य खरेदी करू नका. त्यांना आपल्या गल्लीमध्ये येऊ देऊ नका, अशी द्वेषभावना पसरविणारी माहिती टाकली. या पोस्टकडे अ‍ॅडमिनने दुर्लक्ष केल्यामुळे तो  देखील यासाठी जबाबदारी असल्याने त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी सर्व प्रकारच्या सोशल माध्यमांवर कोरोनाबाबत चुकीची माहिती, आकडेवारी अथवा नागरिकांमध्ये घबराहट होईल अशी माहिती, फोटो अथवा व्हिडिओ तसेच समाजात तेढ निर्माण होईल, असे प्रकार करू नये, असं आवाहन केलं होतं. तसंच राज्य सरकारकडूनही तशी सूचना देण्यात आली होती.  त्यानुसार ही कारवाई  करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

हेही वाचा -मुख्यमंत्रिपदाचा धोका टळला, उद्धव ठाकरे असे होणार आमदार?

अशाच पद्धतीने माहिती पसरविणाऱ्या अन्य 68 नागरिक आणि सुमारे 70 व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर पोलिसांची नजर  असून त्या बाबतची माहिती मागवली असून त्यापैकी कुणीही दोषी आढळल्यास त्यांच्याविरुद्धही अशी कारवाई केली जाणार असल्याची माहिती गुन्हेशाखा  युनिट 2चे साह्यक पोलीस आयुक्त - श्रीधर जाधव यांनी दिली आहे.

First published: April 5, 2020, 11:31 AM IST
Tags:

ताज्या बातम्या