मुंबई, 02 एप्रिल : कोरोना व्हायरसमुळे जगभरात हाहाकार उडाला आहे. भारतातही कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहे. सर्वाधिक जास्त रुग्ण हे महाराष्ट्रात आढळले आहे. या महाभयंकर व्हायरसशी डॉक्टर एकीकडे लढा देत आहे. तर दुसरीकडे कोरोनाचे रुग्ण आणखी वाढू नये म्हणून पोलीस प्रशासन जीवाची बाजी लावून कर्तव्य बजावत आहे. परंतु, या कोरोनाने पोलिसांच्या वसाहतीत शिरकाव केला आहे.
मुंबईतील वरळी परिसरात कोळीवाडा, आदर्श नगरमध्ये अचानक मोठ्या संख्येनं कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यामुळे खळबळ उडाली होती. त्यानंतर आता पोलीस कॅम्पमध्येही कोरोनाचा शिरकाव झाला आहे.
हेही वाचा -रुग्णांच्या मृत्यूनंतरही मरत नाही कोरोना तर..., तज्ज्ञांचा धक्कादायक खुलासा
पोलीस कॅम्पमधील एका इमारतीत पोलीस कर्मचारी कोरोनाबाधित झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलीस आणि महापालिका आरोग्य अधिकारी इमारतीत दाखल झाले आहे. ज्या इमारतीमध्ये हा पोलीस कर्मचारी राहत होता, ती इमारत पूर्णपणे सील करण्यात आली आहे. या पोलीस कर्मचाऱ्याला तातडीने सेव्हन हिल्स रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केल्याची माहिती मिळत आहे.
पत्नी, मुलांची ताटातूट
या पोलीस कर्मचाऱ्याला 20 मार्चपासून ताप येत होता. त्यानंतर आता त्याच्या पत्नीलाही काल बुधवारी रात्रीपासून ताप आणि इतर लक्षणं आढळून आली आहे. त्यामुळे तातडीने या कर्मचाऱ्याच्या पत्नीला कस्तुरबा रुग्णालयामध्ये दाखल केलं आहे.
हेही वाचा - डोंबिवलीत कोरोना पसरतोय, आणखी आढळले 5 रुग्ण, संख्या 19 वर
या पोलीस कर्मचाऱ्याची तीन मुलंही कोरोनाबाधित झाली असावी असा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे या दोन मुलांना सेव्हन हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात येणार आहे. तर मुलीला पोदार हॉस्पिटलमध्ये क्वारंटाइन करणार आहे, अशी माहिती समोर आली आहे.
धारवीमध्ये कर्मचाऱ्यालाच कोरोनाची लागण
दरम्यान, मुंबईतील धारवीमध्ये सॅनिटाइझचं काम करणाऱ्या कर्मचाऱ्यालाच आता कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. 52 वर्षांच्या या कर्मचाऱ्याची कोविडची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानं खळबळ उडाली आहे. हा कर्मचारी वरळीतील रहिवासी असल्याची माहिती मिळत आहे. आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी धारावीतील बुधवारी 56 वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा मृत्यू झाला होता.
Published by:sachin Salve
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.