'लष्कर दाखल झालं', अफवा पसरवणाऱ्या तरुणाला अटक

'लष्कर दाखल झालं', अफवा पसरवणाऱ्या तरुणाला अटक

खबरदारी म्हणून सर्वच राज्यांच्या सीमा या बंद करण्यात आल्या आहे. अशा परिस्थितीत काही माथेफिरू अफवा पसरवण्याचं काम करत आहे.

  • Share this:

मुंबई, 30 मार्च : कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाउन करण्यात आला आहे. खबरदारी म्हणून सर्वच राज्यांच्या सीमा या बंद करण्यात आल्या आहे. अशा परिस्थितीत काही माथेफिरू अफवा पसरवण्याचं काम करत आहे. मुंबईतील पठाणवाडीमध्ये सोशल मीडियावर 'लष्कर दाखल झालंय' अशी अफवा पसरवणाऱ्या तरुणाला अटक करण्यात आली आहे.

कोरोना व्हायरस रोखण्यासाठी डॉक्टर्स आणि पोलीस यंत्रणा जीव धोक्यात घालून आपलं कर्तृत्व पार पाडत आहे. परंतु, अपुऱ्या माहितीच्या आधारे काही जण अफवा पसरवण्याचं काम करत आहे. मुंबईतील पठाणवाडी परिसरात सोहील सलीम पंजाबी नावाच्या तरुणाला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.

हेही वाचा - 7 एप्रिलपर्यंत 'हे' राज्य कोरोनामुक्त होणार, मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वा

या तरुणाने व्हॉट्सअ‍ॅपवर एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये पोलिसांची जागा आता लष्कराने घेतली आहे.  नल बाजार,भिंडी बाजार, डोंगरी, मदनपुरा, काला पानी आणि सात रास्ता परिसरात परिस्थितीत हाताबाहेर गेली असून लष्कराचं पाचारण करण्यात आलं आहे. लोकांवर नियंत्रण मिळवण्यासाठी लाठीचार्ज आणि गोळीबार करण्यात आला, असं या तरुणाने व्हिडिओमध्ये सांगितलं होतं.

परंतु, अशी कोणतीही परिस्थितीत या परिसरात निर्माण झाली नव्हती.  या व्हिडिओच्या आधारे  सोहील सलीम पंजाबी या तरुणाला अफवा पसरवल्या प्रकरणी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.

पिंपरी चिंचवडमध्ये सामूहिक नमाज, गुन्हा दाखल

दरम्यान,  कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आणि गर्दी टाळली जावी म्हणून देशभरात सर्व धर्मियांची प्रार्थनास्थळं बंद ठेवण्यात आली आहेत. मात्र, पिंपरी-चिंचवड शहरात मुस्लीम बांधवांनी एकत्र येऊन रहिवासी इमारतीच्या गच्चीवर सामूहिक नमाज पठण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी आतापर्यंत 13 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. लॉकडाउन दरम्यान आणि जमावबंदीच्या काळात नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला होता.

First published: March 30, 2020, 10:07 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading