चपलांमार्फत पसरू शकतो कोरोनाव्हायरस, संशोधनात धक्कादायक बाब समोर

चपलांमार्फत पसरू शकतो कोरोनाव्हायरस, संशोधनात धक्कादायक बाब समोर

वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या चपलांमार्फत (shoes) रुग्णालयात कोरोनाव्हायरस (Coronavirus) पसरतो आहे, असं चीनमधील (china) एका संशोधनात दिसून आलं आहे.

  • Share this:

बीजिंग, 25 एप्रिल : कोरोनाव्हायरस (Coronavirus) हा वेगवेगळ्या वस्तूंमार्फत पसरू शकतो, कारण तो काही पृष्ठभागांवर विशिष्ट कालावधीपर्यंत जिवंत राहतो. आता कोरोनाव्हायरस हा चपलांमार्फतही (shoes) पसरू शकतो, असं चीनच्या एका संशोधनात समोर आलं आहे.

बीजिंग अकॅडमी ऑफ मिलिटरी मेडिकल सायसन्से आणि वुहानच्या हुओशेनशान हॉस्पिटलने हा अभ्यास केला.  अमेरिकेच्या सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनने हे संशोधन प्रसिद्ध केलं आहे. इंडिया टुडेने याबाबत वृत्त दिलं आहे.

संशोधकांनी  कोरोना रुग्णांवर उपचार सुरू असलेल्या रुग्णालयातील विविध नमुने घेतले.

संशोधकांना दिसून आलं,

जनरल वॉर्डपेक्षा आयसीयूमधील सर्वात जास्त नमुने कोरोना पॉझिटिव्ह होते.

विशेष म्हणजे फार्मसी जिथे कोणताही रुग्ण नव्हता अशा ठिकाणीचे नमुनेही 100 टक्के पॉझिटिव्ह होते.

इतर भागाच्या तुलनेत जमिनीवर व्हायरसचं प्रमाण सर्वात जास्त दिसून आलं आहे.

आरोग्य कर्मचाऱ्यांच्या चपलांच्या सोल्सच्या निम्म्याहून अधिक नमुन्यांवरही व्हायरस सापडलेत.

त्यामुळे वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या चपलांमार्फत कोरोनाव्हायरस पसरतो आहे, असं शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे.

त्यामुळे रुग्णालयातील डॉक्टर, नर्स, आरोग्य कर्मचारी यांच्या चपलाही व्हायरसमुक्त करणं गरजेचं आहे आणि या चपलांमार्फत व्हायरस रुग्णालयाबाहेर इतरत्र जाऊ शकतो.

हे वाचा - कोरोनामुळे पालक घाबरले, मुलांना लसीकरणासाठीही नेत नाहीत, 10 कोटी मुलं धोक्यात

तज्ज्ञांच्या मते, कोरोनाव्हायरस असलेले थुंकीचे शिंतोडे चपलांवर उडाले असतील, तर अशा वस्तूंपासून बनवण्यात आलेल्या चपलांवर व्हायरस असू शकतो.  बहुतेक चपला रबर, प्लास्टिक, चामड्यापासून बनलेले असतात, त्यामुळे त्या कोरोनाव्हायरसचा वाहक ठरू शकतात. जर गर्दीच्या ठिकाणी शूज घातले गेले, तर ते संसर्गाचा स्रोत ठरू शकतात. जर कोरोनाव्हायरस कोणत्याही ठिकाणी 12 तासांपर्यंत राहू शकतात, तर मग शूजवरही असू शकतात.

हे वाचा - गरमीत AC सुरू करताना काळजी घ्या, नाहीतर बळावू शकतो कोरोनाव्हायरसचा धोका

काय खबरदारी घ्याल?

चपला नेहमी घराबाहेर काढा.

त्यानंतर हात आणि पाय साबणाने स्वच्छ धुवून घ्या.

घरात आहे आणि घराबाहेर वापरण्यासाठी वेगवेगळ्या चपला ठेवा.

घराबाहेर वापरत असलेल्या चपला नियमित स्वच्छ करा.

ज्या चपला पाण्याने धुणे शक्य नाही, त्या sanitize करा.

हे वाचा - Good News - भारताची स्थिती सुधारली; कोरोनाच्या रुग्णवाढीचा दर झाला कमी

संकलन, संपादन - प्रिया लाड

First published: April 25, 2020, 6:47 PM IST

ताज्या बातम्या