नवी दिल्ली, 18 जून : भारतात कोरोनाच्या (Coronavirus) संक्रमणाचा कहर वेगानं वाढत आहे. या जीवघेण्या आजारावर उपचार सोधण्यासाठी आणि याचा वाढता प्रसार रोखण्यासाठी संशोधनही सुरू आहे. लॉकडाऊन, सोशल डिस्टंसिंग, मास्क यासारख्या उपायांनीही हे संक्रमण थांबण्याचं काही नाव घेत नाही. अशात एका संशोधनात कोरोना संसर्ग घरातच वेगाने पसरत असल्याचं दिसून आलं आहे.
संशोधनात असं दिसून आलं की, कोरोना विषाणूचं सध्याचे रूप, सार्स कोव-2 जुन्या सार्स विषाणूच्या तुलनेत घरातील परिस्थितींवर दुप्पट संक्रमित होणारा आहे. विशेषत: हा संसर्ग पसरल्यानंतरच त्याची व्यक्तीतली लक्षणं समोर येतात. त्यामुळे घरातून बाहेर निघाल्यानंतर जर कोरोनाची लागण होते तर हा संसर्ग घरातच मोठ्या प्रमाणात पसरण्याची शक्यता आहे.
कसा केला याबाबतीत अभ्यास?
चीन आणि अमेरिकेतील संशोधकांचं म्हणणं आहे की, त्यांच्या या अभ्यासामुळे कोरोनाचं संक्रमण कमी होण्याची शक्यता जास्त प्रमाणात आहे. या संशोधनासाठी चीनच्या गुआंगझोऊ शहरातील संशोधकांनी 350 रूग्ण व त्यांच्या जवळपास 2000 संपर्कांमधील लोकांचा डेटा वापरला. यामध्ये त्यांनी अशा लोकांचा अभ्यास केला ज्यांना संपर्कात आल्यानंतर कोरोनाची लागण झाली. त्यांच्या लक्षणांच्या माहितीवरून कोरोना हा घरातच जास्त पसरतो अशी माहिती समोर आली आहे.
जर एखाद्याला कोरोना झाला तर रूग्णाच्या कुटुंबातील आणि त्याच्या शेजारील लोकांना कोरोना होण्याची जास्त शक्यता आहे. तर सगळ्यात धक्कादायक म्हणजे, जर कोरोना एखाद्यामुळे दुसऱ्याला कोरोना झाला तर त्या दुसऱ्या रुग्णामध्ये कोरोनाची लक्षण मोठ्या प्रमाणात दिसतात आणि त्यांना धोका जास्त असतो असंही या संशोधनात म्हटलं आहे.
काँग्रेसची नाराजी दूर, उद्धव ठाकरेंसोबत बैठकीनंतर थोरातांचा महत्त्वाचा खुलासा
गरमीच्या काळात वेगाने पसरतो
गरमीच्या वेळी कोरोनाचा संसर्ग सहज पसरतो आणि तोदेखील अशा लोकांकडून ज्यांना संसर्ग आहे याची माहितीदेखील नसते. तर संशोधकांनी यामध्ये महत्त्वाची माहिती अशी दिली की, जर आयसोलेशन वॉर्ड किंवा क्वारंटाईन सेंटर उभारले नसते तर या कोरोनाने हाहाकार अधिक माजला असता आणि त्यामुळे 20 ते 50 टक्के लोक संक्रमित झाले असते.
भारतात 13 हजाराहून अधिक प्रकरणं
भारतात मागच्या काही दिवसात दररोज दहा हजारांहून अधिक प्रकरणं येत आहेत. बुधवारी, हा आकडा 13 हजारांच्या पुढे गेला आहे, जो संपूर्ण जगाच्या बुधवारी नवीन प्रकरणांपेक्षा जास्त आहे. भारतातील तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, आतापर्यंत भारतात अशी भयानक स्थिती नाही आली. इतरांच्या तुलनेत संसर्ग अपेक्षेपेक्षा खूपच कमी पसरत आहे.
पुण्यात भाजप युवा मोर्चाचे आंदोलन, चिनी वस्तूंची केली तोडफोड
संपादन - रेणुका धायबर