देशात कोरोनाने केला रेकॉर्ड ब्रेक, गेल्या 24 तासांत गाठला भयंकर आकडा

देशात कोरोनाने केला रेकॉर्ड ब्रेक, गेल्या 24 तासांत गाठला भयंकर आकडा

कोरोनाची 24 तासांतील आतापर्यंत सर्वात धक्कादायक आकडेवारी

  • Share this:

मुंबई, 01 ऑगस्ट : महिन्याच्या सुरुवातीलच कोरोनाची रेकॉर्डब्रेक आकडेवारी समोर आली आहे. जुलैच्या अखेरीस 50 ते 53 हजार दिवसाला नवीन रुग्णांची नोंद करण्यात आल्यानंतर आता गेल्या 24 तासातील धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार गेल्या 24 तासात 57 हजार 117 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा जवळपाास सतरा लाखाच्या आसपास पोहोचत आला आहे. 16 लाख 95 हजार 988 वर पोहोचल्याची माहिती मिळत आहे. गेल्या 24 तासांत 764 रुग्णांचा मृत्यू झाल्यानं आतापर्यंत मृतांचा आकडा 36,511 वर पोहोचला आहे.

देशात आतापर्यंत 10 लाख 94 हजारहून अधिक लोकांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. तर देशात 5 लाख 65 हजार 103 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. महाराष्ट्रातील रूग्णालयात एक लाखाहून अधिक संक्रमित लोकांवर उपचार सुरू आहेत. त्यानंतर दुसर्‍या क्रमांकावर तामिळनाडू, तिसर्‍या क्रमांकावर कर्नाटक, चौथ्या क्रमांकावर आंध्र प्रदेश आणि दिल्ली पाचव्या क्रमांकावर आहे.

जून महिन्याच्या तुलनेत जुलै महिन्यात करोनाबाधितांच्या संख्येत 2.8 टक्क्यांनी वाढ झाली आहे. जून महिन्याच्या अखेरीस देशात करोनाबाधितांची संख्या 4 लाखांच्यावर होती. तर दुसरीकडे जून महिन्याच्या तुलनेत मृतांची संख्यादेखील 1.6 टक्क्यांनी वाढली आहे. जून महिन्याच्या अखेरीस करोनामुळे झालेल्या मृतांची संख्याही 11 हजार 988 इतकी होती. जुलै महिन्यात करोनानं इतका वेग पकडला की अखेरच्या 15 दिवसांमध्ये तब्बल 7.3 लाख रुग्णांची नोंद करण्यात आली.

Published by: Kranti Kanetkar
First published: August 1, 2020, 9:46 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading