Home /News /news /

COVID19: युरोप, इटली, इराण आणि स्पेनमध्ये चीनसारखी अवस्था, मृतांची संख्या 2,158 वर

COVID19: युरोप, इटली, इराण आणि स्पेनमध्ये चीनसारखी अवस्था, मृतांची संख्या 2,158 वर

    पॅरिस, 18 मार्च : चीनमध्ये कोरोनाचा कहर असल्याचा दावा केला जात असला तरी युरोपमध्ये या आजारानं एक भयानक रूप धारण केलं आहे. सर्वाधिक पीडित चीननंतर इटलीचा लोम्बार्डी दुसरा 'वुहान' बनत आहे. या युरोपियन देशात मृतांची संख्या 2,158 वर पोहोचली आहे, जी चीन नंतरची सर्वात जास्त आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे इथे समुद्रकिनारा बंद करण्यात आला आहे. दुसर्‍या क्रमांकावर स्पेन आहे, जिथे मृतांचा आकडा 491 वर पोहोचला आहे. फ्रान्समध्ये लॉकडाऊन होण्यापूर्वी पॅरिस सोडणाऱ्यांची गर्दी आहे. मंगळवारी पहाटे लोकांची मोठी गर्दी रेल्वे स्थानक आणि महामार्गावर आली. त्यांचा असा विश्वास आहे की शहरात येणाऱ्या लोकांमध्ये संक्रमणाची व्याप्ती वाढेल आणि साथीचा रोग भयानक रूप धारण करू शकेल. डब्ल्यूएचओनं सांगितलं की कोरोना विषाणूशी लढण्यासाठी मानसिक आरोग्य सुधारणं महत्त्वाचं आहे. तसेच फ्रान्सचे आरोग्यमंत्री ऑलिव्हियर वर्नन म्हणाले की, लोकांना घरी जाण्यापासून रोखण्याचा सरकारचा कोणताही हेतू नव्हता. तथापि, शहरातील सार्वजनिक जीवनावर कडक निर्बंध कायम राहतील. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी नागरिकांना मंगळवारपासून पुढील 15 दिवस घरात राहण्याचे आदेश दिले. अनावश्यक भेटी आणि सामाजिक कार्यक्रमांवरील बंदीचे उल्लंघन करणार्‍यांवर कारवाई केली जाईल असेही ते म्हणाले. मंगळवारपासून पुढील 30 दिवस युरोपियन युनियनच्या बाह्य सीमा बंद राहतील, असे मॅक्रॉन यांनी सांगितले. फ्रान्सच्या उप-परिवहन मंत्र्यांनी सांगितले आहे की लॉकडाऊन अंतर्गत हायस्पीड इंटरसिटी गाड्या कमी केल्या जातील. इटलीमध्ये दोन दिवसात 700 हून अधिक मृत्यू इटलीमध्ये होणाऱ्या एकूण मृत्यूंपैकी 66 टक्के (1420) मृत्यू हे शहरातीलच आहेत. दोन दिवसांत इटलीमध्ये 700 हून अधिक मृत्यू झाले आहेत. चार दिवसांपूर्वी संसर्गाची 15,113 प्रकरणे झाली होती, तर आता ही संख्या 27,980 वर पोचली आहे. इराणमध्ये 85000 हजार कैद्यांची सुटका इराणमध्ये 85,000 हजार कैदी तात्पुरते सोडण्यात आले आहेत. त्यात राजकीय कैदीही आहेत. त्याच वेळी, गेल्या चोवीस तासात आणखी 135 लोक मरण पावले आहेत. येथे मृतांची संख्या वाढून 988 झाली आहे. संसर्गाची 1178 नवीन प्रकरणे नोंदली गेली आहेत. त्यांची संख्या वाढून 16,169 झाली आहे. 5,389 लोक बरे झाले आहेत. दुसरीकडे इराणच्या मुख्य शत्रू युएईने या काळातल्या संकटात चांगला संदेश दिला आहे. त्याने वैद्यकीय उपकरणाने भरलेली दोन विमाने इराणला पाठविली.
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    Tags: Corona, Coronavirus

    पुढील बातम्या