Home /News /news /

भारताचा कोरोनाशी लढा, मोदी सरकारनं केले 6 मोठे बदल

भारताचा कोरोनाशी लढा, मोदी सरकारनं केले 6 मोठे बदल

फक्त कोरोनाप्रभावित राज्यांतच नाही तर या सूचना देशभरासाठी लागू करण्याचा केंद्राचा निर्णय आहे.

    नवी दिल्ली, 19 मार्च : देशात कोरोनाव्हायरसचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे खबरदारी म्हणून भारत सरकारने महत्त्वाच्या काही सचूना जाहीर केल्या आहे. राज्यातही कोरोनाचा फैलाव वेगाने होत असल्यामुळे अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये जमावबंदी लागू करण्यात आली आहे. या रोगाचा प्रसार रोखण्यासाठी भारत सरकारनं कठोर निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. 22 मार्चपासून पुढच्या एक आठवड्यासाठी भारतात एकही प्रवासी विमान दाखल होणार नाही, असं पत्रसूचना कार्यालयातर्फे सांगण्यात आलं आहे. COVID19 संदर्भात नवीन सूचना जाहीर - 22 मार्चपासून एक आठवडा कोणतेही नियोजित आंतरराष्ट्रीय व्यावसायिक विमान भारतात येण्यास परवानगी नाही. - राज्य सरकारने अधिसूचना काढून 65 वर्षांवरील व्यक्तींना घराबाहेर (वैद्यकीय कामाव्यतिरिक्त) पडू नये, असा सल्ला द्यावा. - त्याचप्रमाणे 10 वर्षाखालील मुलामुलींना घराबाहेर पडू देऊ नये. - रेल्वे आणि हवाई वाहतूक विभागाने सर्व प्रकारच्या प्रवासी सवलती रद्द कराव्या, (अपवाद: विद्यार्थी, रुग्ण आणि दिव्यांग) - राज्य सरकारांनी खासगी क्षेत्राला घरुन काम करण्याची मूभा द्यावी. - गर्दी टाळण्यासाठी केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना आठवड्याआड व वेगळ्या वेळांमध्ये कार्यालयात हजर राहण्याची सूचना. दरम्यान, फक्त कोरोनाप्रभावित राज्यांतच नाही तर या सूचना देशभरासाठी लागू करण्याचा केंद्राचा निर्णय आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून संपूर्ण लॉकडाउनचा निर्णय नसल्याचं सांगण्यात येत आहे. पुणे, कल्याण, डोंबवली दुकानं बंद पुढचा निर्णय येईपर्यंत पुण्यासह कल्याण, डोंबवली परिसरातली दुकानं बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जीवनावश्यक वस्तू आणि औषधांची दुकानं वगळता अन्य दुकानांसाठी हा निर्णय आहे. दरम्यान देशभरात कोरोना व्हायरसमुळे मृतांचा आकडा ३ वर पोहोचला आहे. 166 रुग्णांना लागण झाली आहे. त्यातले सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आढळले आहे. त्यामुळे राज्यात याअगोदरच लाॅकडाउन परिस्थिती निर्माण झाली आहे. पंतप्रधान मोदी गुरुवारी संध्याकाळी जनतेला उद्देशून भाषण करणार आहे. यावेळी कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे. दरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीसुद्धा जनतेशी संवाद साधला. ज्या नागरिकांना होम क्वॉरंटाईन सांगितले आहे त्यांनी स्वत:हूनच घरी राहून स्वत:बरोबरच इतरांचीही काळजी घ्यावी. परिसरात किंवा इतरत्र फिरू नये. अशा व्यक्तींवर शासनाचे लक्ष असून होम क्वॉरंटाईनचा शिक्का असलेली व्यक्ती जर बाहेर फिरताना आढळली तर तिला सक्तीने रुग्णालयात भरती करण्यात येईल, असं सरकारकडून सांगण्यात आलं आहे.
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    Tags: Corona, Corona virus in india, Coronavirus, Coronavirus symptoms

    पुढील बातम्या