नवी दिल्ली, 01 ऑगस्ट : देशात कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. अशात लॉकडाऊन शिथिल केल्यामुळे कोरोनाचा धोका आणखी वाढला आहे. जुलै महिन्यात भारतात 11.1 लाख करोनाबाधित आढळले असून 19 हजार 122 जणांचा करोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. खरंतर ही आकडेवारी खूप मोठी आहे. त्यामुळे ऑगस्टमध्ये हा आकडा वाढेल अशी भीती तज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे.
जून महिन्याच्या तुलनेत जुलै महिन्यात करोनाबाधितांच्या संख्येत 2.8 टक्क्यांनी वाढ झाली आहे. जून महिन्याच्या अखेरीस देशात करोनाबाधितांची संख्या 4 लाखांच्यावर होती. तर दुसरीकडे जून महिन्याच्या तुलनेत मृतांची संख्यादेखील 1.6 टक्क्यांनी वाढली आहे. जून महिन्याच्या अखेरीस करोनामुळे झालेल्या मृतांची संख्याही 11 हजार 988 इतकी होती. जुलै महिन्यात करोनानं इतका वेग पकडला की अखेरच्या 15 दिवसांमध्ये तब्बल 7.3 लाख रुग्णांची नोंद करण्यात आली.
मटका किंगचा मर्डर, ऑफिससमोरच गोळ्या झाडून केलं ठार
जुलै महिन्याच्या पहिल्या पंधरा दिवसांच्या तुलनेत ही संख्या जवळपास दुप्पट आहे. त्यामुळे जसजसे लॉकडाऊनचे नियम शिथिल झाले तसा कोरोनाचा धोका वाढल्याचं चित्र आहे. अशात देशातील कोरोनाव्हायरसचा वेग काही थांबत नाही आहे. देशात कोरोनाची सर्वाधिक सक्रिय प्रकरणे महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रातील रूग्णालयात एक लाखाहून अधिक संक्रमित लोकांवर उपचार सुरू आहेत. त्यानंतर दुसर्या क्रमांकावर तामिळनाडू, तिसर्या क्रमांकावर कर्नाटक, चौथ्या क्रमांकावर आंध्र प्रदेश आणि दिल्ली पाचव्या क्रमांकावर आहे. या पाच राज्यांमध्ये सर्वाधिक सक्रिय प्रकरणे आहेत. सक्रीय प्रकरणात भारत जगात चौथ्या क्रमांकावर आहे. म्हणजेच भारत हा चौथा देश आहे जिथे बहुतांश संक्रमितांवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
ठाकरे सरकारमधील मंत्री झपाटलेल्या सिनेमातील कलाकार,महायुतीच्या नेत्याची टीका
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) ने दिलेल्या माहितीनुसार, 30 जुलैपर्यंत 1 कोटी 88 लाख 32 हजार 970 लोकांच्या कोविडचे नमुने तपासण्यात आला आहे.
Published by:Renuka Dhaybar
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.