Home /News /news /

दिलासादायक 2 बातम्या! मोदींच्या Lockdown निर्णयाचे फायदे आले समोर

दिलासादायक 2 बातम्या! मोदींच्या Lockdown निर्णयाचे फायदे आले समोर

कोरोनाव्हायरचा संसर्ग किती वेगाने पसरतो याचे दाखले काही अभ्यासांमधून स्पष्ट झाले आहेत.

    नवी दिल्ली, 20 एप्रिल : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 24 मार्चच्या मध्यरात्रीपासून देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा केली. त्या वेळी Coronavirus चा फैलाव नुकताच सुरू झाला होता. पण लॉकडाऊन असूनही त्यानंतर या विषाणूचा फैलाव मोठ्या प्रमाणावर देशभर झाला. जवळपास सर्वच राज्यांमध्ये थोड्या-फार प्रमाणात या विषाणूची लागण झाली. पण अपेक्षेपेक्षा या विषाणूचा संसर्ग धीम्या गतीने पसरला. लॉकडाऊन असल्याने याचा प्रसार नियंत्रित राहिला, असं आज केंद्र सरकारकडून जारी झालेल्या आकडेवारीतून स्पष्ट झालं आहे. गोवा हे राज्य कोरोनामुक्त झालं आहे. तर गेल्या 15 दिवसात एकही कोरोनाग्रस्त न आढळलेल्या जिल्ह्यांची संख्या वाढून 59 झाली आहे. 18 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या नियंत्रित राखण्यात यश आलं आहे, ही दुसरी दिलासादायक बातमी आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. Coronavirus मुळे देशभरात आतापर्यंत 559 लोकांचे प्राण घेतले आहेत. आतापर्यंत देशभरात 17,656 कोरोनाग्रस्तांची नोंद झाली असून त्यातले 14,255 अद्याप उपचार घेत आहेत. 2,851 रुग्ण बरे होऊन परतले आहेत, असं आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी सांगितलं. खूशखबर! भारतासमोर कोरोनाचा लागत नाहीये टिकाव, कमजोर पडतोय व्हायरस कोरोनाव्हायरचा संसर्ग किती वेगाने पसरतो याचे दाखले काही अभ्यासांमधून स्पष्ट झाले आहेत. गुणाकार पद्धतीने या विषाणूचा फैलाव होतो. किती दिवसात रुग्णसंख्या दुप्पट झाली यावरून हा विषाणी किती वेगाने पसरतो आहे याचं अनुमान काढता येतं. देशात या विषाणूच्या फैलावाचा वेग पाहता 18 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी या फैलावावर नियंत्रण मिळवलं आहे, असं म्हणता येईल. या राज्यांमध्ये विषाणूच्या प्रसाराचा वेग राष्ट्रीय सरासरीच्या खूप कमी आहे. गेल्या आठवड्यात हा वेग कमी झाला. रुग्णसंख्या दुप्पट व्हायचा वेग गेल्या आठवड्यात 7.5 दिवसांवर आला. लॉकडाऊन जाहीर झाला तेव्हा हा वेग 3.4 दिवस होता. 21 दिवसांच्या लॉकडाऊनचा परिणाम आत्ता दिसायला लागला आहे. देशातल्या 18 राज्यांमध्ये हा वेग 7.5 दिवसांपेक्षाही आणखी कमी आहे सर्वप्रथम कोरोनाचे रुग्ण सापडले त्या केरळमध्ये या विषाणूचा फैलाव नियंत्रित करण्यात चांगलं यश आलं आहे. तिथे रुग्णसंख्या दुपटीने वाढायला 30 दिवसांपेक्षाही जास्त दिवस लागले. ओडिशा आणि केरळ या दोन राज्यांमध्ये फैलावाचा वेग कमी आहे, असं आरोग्य सहसचिव लव अग्रवाल यांनी सांगितलं. गेल्या 24 तासांत देशभरात 1553 नवे रुग्ण दाखल झाले आहेत आणि 36 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. दिल्लीत हा रुग्ण दुपटीने वाढण्याचा वेग 8.5 दिवस आहे. तर कर्नाटक, तेलंगण, जम्मू-काश्मीर, आंध्र प्रदेश, पंजाब, छत्तीसगढ, तमिळनाडू आणि बिहार या राज्यांतही राष्ट्रीय सरासरीच्यापेक्षा कमी वेगाने रुग्णवाढ होत आहे. आमदार रवी राणा, खासदार नवनीत राणा यांचे चुकीचे स्वॅब सॅम्पल घेणं भोवलं
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    Tags: Corona

    पुढील बातम्या