Home /News /news /

महाराष्ट्रात संचारबंदी! काय सुरू राहणार...कशाला लागणार टाळं? जाणून घ्या

महाराष्ट्रात संचारबंदी! काय सुरू राहणार...कशाला लागणार टाळं? जाणून घ्या

ऑटोमेटिव्ह (सुधारित) अॅक्ट 1961 नुसार, रहदारी नियमांचं उल्लंघन केल्यास एका दिवसात दोनदा दंड भरला जात नाही. दंड दिवसाला फक्त एकदाच भरावा लागतो.

ऑटोमेटिव्ह (सुधारित) अॅक्ट 1961 नुसार, रहदारी नियमांचं उल्लंघन केल्यास एका दिवसात दोनदा दंड भरला जात नाही. दंड दिवसाला फक्त एकदाच भरावा लागतो.

सरकारला कठोर निर्णय घेणं गरजेचं झालं होतं. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात संचारबंदीची घोषणा केली आहे.

    मुंबई, 23 मार्च : जगभरात हाहाकार उडवून देणाऱ्या कोरोनाने महाराष्ट्राला धडक दिली आहे. रुग्णांचा रोज नवा आकडा समोर येत आहे. महाराष्ट्रात 24 तासांत तब्बल 15 रुग्ण वाढले आहेत. महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 89 वर पोहोचली आहे. मागच्या दोन दिवसांमध्ये महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वेगान वाढ होत असल्यानं चिंता व्यक्त केली जात आहे. भारतात आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाला तर कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 396 वर पोहोचली आहे. याच पार्श्वभूमीवर सरकारला कठोर निर्णय घेणं गरजेचं झालं होतं. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात संचारबंदीची घोषणा केली आहे. 'कोरोना विषयक सातत्याने माहिती देणे माझे कर्तव्य आहे , मी सर्वाना काळजीपोटीच आपल्याला या सूचना देतो. आपण आता अगदी निर्णायक टप्प्यावर आलो आहोत. आपण कोरोनाचा प्रादुर्भाव जर आत्ताच रोखला नाही तर जगात होते आहे तसे थैमान होईल. काल राज्यात १४४ कलम लावले होते आता मला राज्यात संचार बंदी लावावी लागते आहे,' असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी संचारबंदीची घोषणा केली. संचारबंदीमध्ये काय सुरू राहणार, काय होणार बंद? जिल्ह्यांच्या सीमा देखील बंद करण्यात येणार आहेत, त्यामुळे तुम्ही जिल्ह्याबाहेर प्रवास करू शकणार नाहीत. खासगी वाहने अत्यावश्यक कारणांसाठी असेल तरंच सुरू राहतील. रिक्षा, टॅक्सी यामधील प्रवाशांची संख्या मर्यादित असेल. काल आपण इतर राज्याच्या सीमा बंद केल्या होत्या आज आपण राज्यातील जिल्ह्यांच्या सीमा देखील बंद करीत आहोत. या वाहतूक बंदीत खासगी वाहने देखील आली. जीवनावश्यक वस्तू, औषधे, अन्न धान्य तसेच त्यांची ने-आण करणारी वाहने सुरू राहतील. पशू खाद्य मिळेल, पशूंचे दवाखानेही उघडे राहतील. कृषीमालाशी सबंधित वाहतूक सुरू राहील. सर्व धर्मीयांची प्रार्थना स्थळे पूर्णपणे बंद राहतील प्रसंगी आशा, अंगणवाडी, होमगार्ड्स यांना देखील वैद्यकीय बाबतीत प्रशिक्षण देऊन तयार करीत आहोत. घरी विलगीकरण केलेल्यांनी सरकारच्या सूचना पाळायच्या आहेत
    Published by:Akshay Shitole
    First published:

    Tags: Uddhav thackeray

    पुढील बातम्या