भारतात सप्टेंबरपर्यंत कोरोनाचा नाश करण्यात यश मिळणार, तज्ज्ञांचा दावा

भारतात सप्टेंबरपर्यंत कोरोनाचा नाश करण्यात यश मिळणार, तज्ज्ञांचा दावा

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून आलेल्या आकड्यांनुसार देशात कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 2,46,628 वर पोहोचली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 07 मे : देशात कोरोनाचा संसर्ग सप्टेंबरपर्यंत महिन्यात संपुष्टात येईल असा दावा आरोग्य मंत्रालयातील दोन तज्ज्ञांनी केला आहे. या निष्कर्षापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना गणिताचा वापर केला असल्याचं सांगितलं जात आहे. देशभरात आठवड्याभरात 61 हजारहून अधिक कोरोनाचे नवीन रुग्ण समोर आलं आहेत. अशा स्थितीतही सप्टेंबरपर्यंत कोरोनाचा संसर्ग संपुष्टात येईल असा दावा करणारे तज्ज्ञ काय म्हणतात जाणून घ्या

तज्ज्ञांच्या मते संसर्गाचं गुणांकन 100 टक्क्यांपर्यंत पोहोचतं तेव्हा तो नष्ट होतो आणि आजाराची साथ संपते. हे विश्लेषण एपिडेमिओलॉजी इंटरनॅशनल या जर्नलमध्ये प्रकाशित केले गेले आहे. आरोग्य मंत्रालयाच्या आरोग्य सेवा महासंचालनालयात (सार्वजनिक आरोग्य) उपसंचालक डॉ. अनिल कुमार आणि डीजीएचएसच्या सहाय्यक संचालक (कुष्ठरोगी) रुपाली रॉय यांनी हा अभ्यास केला.

भारतात कोरोनाचे संक्रमण 2 मार्चपासून होण्यास सुरुवात झाली. तेव्हापासून आतापर्यंत कोरोनाग्रस्तांचा आकडा वेगानं वाढत आहे. यामध्ये एकूण कोरोनाग्रस्त, आजारातून बरे झालेल्यांची संख्या आणि मृत्यू झालेल्यांच्या संख्येचा अभ्यास करण्यात आला. या सगळ्या आकड्यांचा बेलीज रिलेटिव्ह रिमूवल रेट (BMRRR) नुसार गणित पद्धतीनं अभ्यास करून त्याचं विश्लेषण कऱण्यात आलं आहे. ज्याला आपण सांख्यायिकी विश्लेषण असं म्हणू शकतो. या विश्लेषणानुसार सप्टेंबरच्या मध्यापर्यंत कोरोना व्हायरसचा संसर्ग भारतात तरी संपुष्टात येईल असा दावा करण्यात आला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून आलेल्या आकड्यांनुसार देशात कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 2,46,628 वर पोहोचली आहे. 1,19,293 रुग्ण बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. रविवारी पहाटेपर्यंत भारतात कोरोना विषाणूमुळे 6,929 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

संपादन- क्रांती कानेटकर

First published: June 7, 2020, 10:23 AM IST

ताज्या बातम्या