...आणि अखेर तो क्षण आला, कोरोना संक्रमित महिलेच्या आयुष्यातला सगळ्यात आनंदी प्रसंग

...आणि अखेर तो क्षण आला, कोरोना संक्रमित महिलेच्या आयुष्यातला सगळ्यात आनंदी प्रसंग

कोरोना संक्रमित असलेल्या एका गर्भवती महिलेचे एका क्षणात आयुष्यच बदललं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 25 एप्रिल : जगभरात कोरोना व्हायरस (Coronavirus) वेगाने पसरत आहे. या संसर्गजन्य रोगामुळे प्रत्येक व्यक्तीच्या जीवाला धोका आहे. त्यामुळे संपूर्ण देश लॉकडाऊन करण्याची वेळ आली. या रोगामुळे अनेकांनी आपले प्राण गमावले. पण यात एक मनाला आनंद देणारी बातमी समोर आली आहे. कोरोना संक्रमित असलेल्या एका गर्भवती महिलेचे एका क्षणात आयुष्यच बदललं आहे.

शुक्रवारी मेडिकल हॉस्पिटलमध्ये एक अशी बातमी आली की, सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. कोरोना संक्रमित असलेल्या एका गर्भवती महिलेने एका गोड बाळाला जन्म दिला. पाच दिवसानंतर या बाळाची कोरोना चाचणी केली असता त्याचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. बाळाच्या जन्मामुळे सगळ्या कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे. पण आई कोरोनाबाधित असल्यामुळे चिंता आहे.

मेडिकल रुग्णालयाच्या पथकानं कोरोनाबाधित महिलेची सीझेरियन प्रसूती केली. डॉक्टरांनी महिलेला एका स्वतंत्र खोलीत एकाकीकरणात ठेवलं आहे. मुलाला कुटुंबाच्या ताब्यात देण्यात आलं आहे. पण प्रसुती झाल्यानंतर आईने काही क्षणात आपल्या मुलाचा चेहरा पाहिला. त्यामुळे तिला खूप आनंद झाल्याचं तिने सांगितलं. नवजात मुलास कोणताही संसर्ग पसरला नाही म्हणून तो ताबडतोब नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

प्रेयसीने खेळला प्रेमाचा डबल गेम, रंगे हात पाहिल्यावर प्रियकराने केला खेळ खल्लास

कोरोनाबाधित महिलेला कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर येताच मंगळवारी तिला मेडिकल रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दरम्यान, तिच्या कुटुंबियांनादेखील क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आलं आहे. गुरुवारी रात्री महिलेला प्रसुतीकळा सुरू झाल्या. डॉ. अभिलाषा गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली महिलेची प्रसूती करण्यात आली. तिचे सिझर करण्यात आले.

सुरक्षा नियमांचं केलं पालन

मेडिकल रुग्णालयाच्या वैद्यकीय वॉर्डच्या पथकाने सांगितले की, प्रसूती दरम्यान डॉक्टरांनी पूर्ण काळजी घेतली. डॉक्टरांची टीम पीपीआय किट घालून ऑपरेशन थिएटरमध्ये आली. वैद्यकीय प्राचार्य डॉ.आरसी गुप्ता यांनी सांगितलं की, मूल पूर्णपणे सुरक्षित आहे.

मुंबई-पुण्यात लॉकडाऊन वाढणार; शहरं जागी व्हायला किमान जून उजाडणार

First published: April 25, 2020, 3:48 PM IST

ताज्या बातम्या