VIDEO : 'कृपया लाठीचार्ज ना करे', पोलिसांचा मार खाण्यापासून वाचण्यासाठी 'लय भारी' आयडिया
रस्त्यांवर विनाकारण फिरणाऱ्या तरुणांना आणि लोकांना पोलीस काठ्यांनी चांगलाच प्रसाद देत आहेत. त्यामुळे पोलिसांच्या काठीपासून वाचण्यासाठी नागरिक वेगवेगळी शक्कल लढवताना पाहायला मिळत आहेत.
मुंबई, 28 मार्च : कोरोना व्हायरसचं संक्रमण टाळण्यासाठी 21 दिवसांचं लॉकडाऊन करण्यात आलं आहे. यादरम्यान रस्त्यांवर विनाकारण फिरणाऱ्या तरुणांना आणि लोकांना पोलीस काठ्यांनी चांगलाच प्रसाद देत आहेत. त्यामुळे पोलिसांच्या काठीपासून वाचण्यासाठी नागरिक वेगवेगळी शक्कल लढवताना पाहायला मिळत आहेत. टीकटॉकवर भन्नाट व्हिडीओ व्हायरल होत आहेत. घराबाहेर पडल्यानं पोलीस नागरिकांना शिक्षा देत आहेत. यापासून वाचण्यासाठी नागरिकांनीही अनोखी युक्ती केली. कोणी टी-शर्टमध्ये ट्रे लपवला तर कुठी थाळी तर काही जण पोलिसांच्या दांड्याक्याच्या भीतीनं गळ्यात पाटी बांधून बाजारात भाजी आणायला गेल्याचं पाहायला मिळालं आहे. टीकटॉकवरील हे मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
देशभरात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 800 हून अधिक पोहोचली आहे. ही वाढती संख्या भीती निर्माण करणारी आहे. लॉकडाऊनचं महत्त्व आणि गांभीर्य अजूनही अनेक लोकांना न समजल्यानं बाहेर रस्त्यांवर फिरताना प्रवास करताना नागरिक दिसत आहेत. प्रशासन आणि सरकारनं 21 दिवसांसाठी लागू केलेले नियम मोडणाऱ्यांवर पोलिसांनी कुठे समजूदारीनं तर कुठे लाठीचा मार देऊन घरी पिटाळून लावलं आहे. मात्र जीवनावश्यक सेवा घेण्यासाठी तर घरातून बाहेर पडावच लागतं. अशावेळी काय करायचं हा प्रश्न पडतोो. म्हणूनच टीकटॉकवर काही तरुणांनी भन्नाट युक्ती शोधून काढली आहे.
कृपया लाठीचार्ज ना करे असं पहिल्या व्हिडीओमध्ये गळ्यात पाटी घालून तरुण दुचाकीवरून बाजारात जात आहे. तर तिसऱ्या व्हिडीओमध्ये तरुण शर्टच्या आतमध्ये काठीचे फटके बसू नयेत म्हणून भांडी ठेवत असल्याचं पाहायला मिळालं आहे. या व्हिडीओला आतापर्यंत 221 हजार हून अधिक लाईक्स तर 500 हून अधिक कमेंट्स मिळाल्या आहेत. हे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर ही ट्रीक चर्चेचा विषयच झाली आहे.