PM मोदींच्या आवाहनानंतर लाईट बंद होताच पोलीस पाटलाच्या घरावर तुफान दगडफेक

PM मोदींच्या आवाहनानंतर लाईट बंद होताच पोलीस पाटलाच्या घरावर तुफान दगडफेक

या प्रकरणी त्यांनी पोलिसांत लेखी तक्रार दाखल केली असून अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • Share this:

भिवंडी, 06 एप्रिल : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोनाविरोधात लढण्यासाठी रविवारी रात्री 9 वाजून 9 मिनिटांनी लाईट बंद करून दिवा लावण्याचं आवाहन केलं होतं. या आवाहनाला प्रतिसाद देत भिवंडीतील नागरिकांनी लाईट बंद होताचा अंधाराचा फायदा घेऊन अज्ञातांचे कारनामे सुरू झाले. त्यांनी पिंपळास गावचे पोलीस पाटील अशोक जाधव यांच्या घरावर तुफान दगडकेक केली. पुन्हा लाईट लावेपर्यंत हे अज्ञात तिथून पसार झाले होते. कोरोनाचा संसर्ग झपाट्यानं वाढत आहे. महराष्ट्रात जवळपास 650 हून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.

कोरोनाचं संक्रमण टाळण्यासाठी वेगवेगळ्या पातळीवर योजना राबवल्या जात आहे. सरकारकडून 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊनच्या सूचना देण्यात आल्या आहेत. लोकडाऊन असताना अशा परिस्थिती गावात दारू विक्री होऊ नये,  गावातील काही मोकाट मुले  चौका चौकामधे फिरत असल्याने  त्यांना विरोध करीत  पोलिसांसोबत जनजागृती करीत असल्यामुळे आपल्या घरावर दगडफेक  केल्याचा संशय पोलीस पाटील जाधव यांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी त्यांनी पोलिसांत लेखी तक्रार दाखल केली असून आता या प्रकरणी दगडफेक करणाऱ्या अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे.

हे वाचा-10 जूनपर्यंत असणार लॉकडाउन? WHOच्या व्हायरल वेळापत्रकामागचे हे आहे सत्य

कोरोनाविरोधात लढण्यासाठी रविवारी 9 वाजून 9 मिनिटांला दिवा पेटवून देशातील जनतेने राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्याऐवजी काही समाजकंटकांनी अंधाराचा फायदा घेऊन पोलीस पाटलाच्या घरावर वैमनस्यातून दगडफेक केली आहे. एकीकडे कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी वेगवेगळ्या पातळीवर यंत्रणा कार्य करत असताना कााही नागरिकांना अजूनही त्याचं गांभीर्य न कळल्यानं असे प्रकार घडत आहेत. इंदूर, कर्नाटकातही पोलिसांवर दगडफेक केल्याचे प्रकार समोर आले होतो.

हे वाचा-VIDEO: दिवे लावण्याऐवजी तोंडातून काढले आगीचे लोळ, नंतर चेहऱ्यालाच लागली आग

First published: April 6, 2020, 9:04 AM IST

ताज्या बातम्या