मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

महापौरांना करायची आहे रुग्णसेवा; म्हणाल्या, मी परिचारिकाच, मन स्वस्थ बसू देत नाही!

महापौरांना करायची आहे रुग्णसेवा; म्हणाल्या, मी परिचारिकाच, मन स्वस्थ बसू देत नाही!

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या (केडीएमसी) हद्दीतही कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे.

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या (केडीएमसी) हद्दीतही कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे.

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या (केडीएमसी) हद्दीतही कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे.

कल्याण, 8 एप्रिल: मुंबईसह उपनगरात कोरोनाबाधित रुग्ण झपाट्यानं वाढत आहेत. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या (केडीएमसी) हद्दीतही कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 38 वर पोहोचली आहे. बुधवारी एकाच कुटुंबातील दोन महिलांची टेस्ट पॉझि़टिव्ह आली आहे. दुसरीकडे केडीएमसीच्या महापौर विनिता राणे यांनी पुन्हा रुग्णसेवेची इच्छा व्यक्त केली आहे. यासंदर्भात विनिता राणे यांनी महापालिका आयुक्तांकडे कायदेशीर परवानगीही मागितली आहे. हेही वाचा...यवतमाळ जिल्ह्यात 8 रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह, 7 जणांचे 'तबलिगी' कनेक्शन महापौर विनिता राणे या नगरसेविका होण्याआधी मुंबई महानगर पालिकेच्या बी.वाय.एल नायर रुग्णालयात 32 वर्षे परिचारिका म्हणून कार्यरत होत्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनानंतर महापौर विनिता राणे यांनी पुन्हा रुग्णसेवा करण्याची इच्छा दर्शवली आहे. याबाबत त्यांनी आयुक्तांना एक पत्र देऊन कायदेशीर परवानगी मागितली आहे. हेही वाचा...बारामतीत एक वर्षाच्या चिमुरडीला कोरोना, एकाच कुटुंबातील पाच जणांना लागण महापौर विनिता राणे यांनी यांनी सांगितलं की, ' माझ्याकडे रुग्णसेवेचा प्रदीर्घ अनुभव माझ्या गाठीशी आहे. सध्याच्या परिस्थिती माझ्या वैद्यकीय क्षेत्रातील माझे सर्व सहकारी डॉक्टर्स, परिचरिका रुग्णालयातील सर्व स्टाफ जिवाची पर्वा न करता अहोरात्र काम करीत आहेत. मी पेशाने परिचारीका असल्याने माझे मन मला स्वस्थ बसू देत नाही म्हणून मी कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या रुग्णालयातील रुग्णांसाठी सेवा देण्याची माझी इच्छा आहे.' हेही वाचा... धक्कादायक! केईएम रुग्णालयातील NICU मधील स्वच्छता कर्मचारी कोरोनाबाधित डोंबिवलीत कोरोनाचे 2 नवे रुग्ण कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या (केडीएमसी) हद्दीतही कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. डोंबिवली पूर्वेत आणखी 2 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. दोन महिलांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. धक्कादायक म्हणजे या दोन्ही महिला एकाच कुटुंबातील आहेत. आता कल्याण- डोंबिवलीत आता कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 38 वर पोहोचली आहे.केडीएमसीने आता या दोन्ही महिलांना मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. हेही वाचा.. महिलांपेक्षा पुरुष coronavirus चे सर्वाधिक शिकार, डॉक्टरांनी दिली 'ही' कारणं आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत घरोघरी जाऊन सर्वेक्षण चालू असून नागरिकांनी घाबरून न जाता सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणे आढळून आल्‍यास त्‍वरीत महापालिकेच्‍या रूग्‍णालयाशी संपर्क साधावा, महापालिकेच्या आरोग्य पथकास सहकार्य करावे तसंच अधिक माहितीकरीता बाई रूक्‍मिणीबाई रूग्‍णालय, कल्‍याण येथील 0251- 2310700 व शास्‍त्रीनगर सामान्‍य रूग्‍णालय, डोंबिवली येथील 0251- 2481073 व 0251- 2495338 या हेल्‍पलाईनवर संपर्क साधावा, असं आवाहनही महापालिकेमार्फत करण्यात आले आहे. संपादान- संदीप पारोळेकर
Published by:Sandip Parolekar
First published:

Tags: Corona, Coronavirus symptoms, KDMC

पुढील बातम्या