Home /News /news /

लॉकडाऊनमध्ये भीषण अपघात, मिनी ट्रक आणि लॉरीच्या धडकेत 5 जणांचा जागीच मृत्यू

लॉकडाऊनमध्ये भीषण अपघात, मिनी ट्रक आणि लॉरीच्या धडकेत 5 जणांचा जागीच मृत्यू

मिनी ट्रकमधून 30 जण प्रवास करत होते. हे सर्व मजूर असल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली आहे.

    शमशाबाद, 28 मार्च : तेलंगणामध्ये लॉकडाऊनदरम्यान एक मोठा अपघात झाला आहे. मिनी ट्रक आणि लॉरीची एकमेकांना धडक झाली आणि भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये 5 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 6 जण गंभीर जखमी आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. लॉकडाऊनदम्यान घराबाहेर न पडण्याचा सूचना प्रशासनाकडून करण्यात आल्या असतानाही हे लोक प्रवास करत होते. मिनी ट्रकमध्ये 30 लोक प्रवास करत असल्याची माहिती मिळत आहे. हे सर्वजण कर्नाटकचे होते. लॉकडाऊनच्या घोषणेनंतर हे सर्वजण आपल्या घरी तेलंगणाहून कर्नाटकला जात असताना हा भीषण अपघात झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. शमशाबाद पोलीस अधिकारी व्यंकटेश यांनी दिलेल्या माहितीनुसारर मिनी ट्रेकमधील सर्व लोक मजूर होते. त्यांनी जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे. स्थानिक रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. कोरोना व्हायरसचा प्रादूर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. 700 हून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे तर आतापर्यंत 19 लोकांना मृत्यू झाला आहे. कोरोना व्हायरसवर यशस्वी मात केलेल लोक 67 असल्याची माहिती केंद्री आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. याच कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी देशभरात 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन करण्यात आलं आहे. त्यामुळे सर्व कामं ठप्प झाली आहेत. त्यामुळे या मजुरांची कामंही थांबली होती. हे मजूर तेलंगणाहून कर्नाटकला आपल्या घरी जात असताना हा भीषण अपघात झाला आहे.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Coronavirus, Coronavirus symptoms, Karnataka, Telangana

    पुढील बातम्या