सोलापूर शहरातही लॉकडाऊन, ग्रामीण भागाबाबत अद्याप निर्णय नाही!

कोरोनाच्या स्थितीमुळे हतबल झालेल्या प्रशासनाने आता पुन्हा लॉकडाऊनच्या पर्यायाचा अवलंब केला आहे.

कोरोनाच्या स्थितीमुळे हतबल झालेल्या प्रशासनाने आता पुन्हा लॉकडाऊनच्या पर्यायाचा अवलंब केला आहे.

  • Share this:
सोलापूर, 12 जुलै : महाराष्ट्रातील मुंबई, पुण्यासारख्या मोठ्या शहरांसोबत इतर मुख्य शहरे आणि ग्रामीण भागातही कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरत आहे. अनलॉक प्रक्रियेनंतर तर ग्रीनझोन असलेल्या भागातही कोरोनाचा शिरकाव झाला आणि त्याचं रुपांतर नंतर हॉटस्पॉटमध्ये झालं. या स्थितीमुळे हतबल झालेल्या प्रशासनाने आता पुन्हा लॉकडाऊनच्या पर्यायाचा अवलंब केला आहे. सोलापूर शहरात 16 ते 26 जुलै या कालावधीत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे सोलापूर शहरातील परिस्थिती नियंत्रणात येण्याची अपेक्षा आहे. मात्र असं असलं तरी दुसरीकडे लॉकडाऊनच्या 4 दिवस आधीच रस्त्यावर तुरळक गर्दी पहायला मिळत आहे. लॉकडाऊनच्या दहा दिवसात केवळ दूध आणि मेडीकलसाठीच बाहेर पडता येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पुढील चार दिवसात आवश्यक त्या वस्तू खरेसी करावी असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आलेय. तर दुसरीकडे ग्रामीण भागातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. मात्र अद्याप ग्रामीण भागात याबाबत निर्णय झाला नाही. त्यामुळे ग्रामीण भागातही लॉकडाऊन होतोय का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. दरम्यान, सोलापूर जिल्ह्यात एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 3978 इतकी झाली आहे. तर जिल्ह्यात 332 जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. तर सध्या सोलापूर जिल्ह्यात 1560 ॲक्टिव्ह केसेस आहेत. दिलासादायक बाब म्हणजे जिल्ह्यातील 2086 जणांनी कोरोनावर मात केली आहे.
Published by:Akshay Shitole
First published: