एखादी कोंबडी मृत झाल्यावर अन्य कोंबड्या त्यावर तुटून पडत आहेत. त्यामुळे अशा मृत कोंबड्या शोधून बाहेर टाकण्याची वेळ पोल्ट्रीधारकांवर आली आहे. हे दृश्य बघूनच अनेकांच्या अंगावर काटा येत आहे. दररोज 100 ते 200 कोंबड्या अशा रितीने मरत आहेत. त्याचाही मोठा आर्थिक फटका बसत आहे. हेही वाचा -लॉकडाऊन संपल्यानंतरही बंदी राहणार कायम, हा आहे सरकारचा पुढचा प्लान त्यामुळे पोल्ट्रीधारक देशोधडीला लागला आहे. संचारबंदी मुळे कोंबड्यांना खाद्य मिळत नाही. खाद्याअभावी ते एकमेकांना जीवानिशी मारत आहेत. मृत कोंबड्यांना इतर कोंबड्या खाण्याचा प्रयत्न करीत असल्याचे भयावह चित्र ठिकठिकाणी दिसत आहे. मागील एक ते दीड महिन्यापासून चिकनबाबत अफवांमुळे चिकन विक्री थांबली आहे. याचा सर्वाधिक मोठा फटका पोल्ट्री व्यावसायिकांना बसला आहे. विक्रीअभावी अनेक कोंबड्या शेडमध्ये पडून आहेत. वाहतूक बंद असल्यामुळे खाद्य पुरवठाही बंद आहे. त्यामुळे कोंबड्या भुकेने तडफडत आहेत. काही भुकेने तडफडून मरत आहेत, तर काही ठिकाणी भुकेपोटी कोंबड्या इतर कोंबड्यांना जीवानिशी मारू लागल्याचे चित्र अनेक पोल्ट्रीमधून दिसू लागले आहे. मालाची विक्री होत नसल्यामुळे भांडवल गुंतवून पडले आहे. व्यवसायासाठी काढलेले कर्ज कसे फेडायचे? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. सरकारने याचा विचार करून मदत करावी, अशी मागणी होत आहे. हेही वाचा -लॉकडाऊनमध्ये 'चेन्नई एक्स्प्रेस' चर्चेत, शाहरूखचा प्रसिद्ध डायलॉग VIRAL चिकन बाबत पसरविलेल्या अफवेमुळे मार्केटमध्ये चिकनला मागणी नाही. दोन ते तीन किलोची कोंबडी 80 ते 100 रुपयांना किरकोळ विक्री सुरू आहे. तर कंपनीकडून किलोला 5 ते 10 रुपये दर दिला जात आहे. त्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी 70 ते 80 दिवस झालेल्या कोंबड्या शेडवर शिल्लक आहेत. त्या कोंबड्यांना कंपनीकडून खाद्य पुरवठा सुद्धा केला जात नाही आणि विक्री सुद्धा बंद आहे. या शिल्लक कोंबड्यांचं करायचं काय असा प्रश्न पोल्ट्रीधारकासमोर पडला आहे.कोरोना कोंबड्याच्या जिवावर उठला, कोंबड्याच कोंबड्यांना खाताय #CoronaInMaharashtra pic.twitter.com/ewRunMYZzA
— sachin salve (@SachinSalve7) April 6, 2020
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.