माणुसकीचा पाझर फुटला, रुग्णाला नातेवाईकांनी नाही पण डॉक्टरने भरवलं जेवण

माणुसकीचा पाझर फुटला, रुग्णाला नातेवाईकांनी नाही पण डॉक्टरने भरवलं जेवण

उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णाचे नातेवाईक न आल्यानं डॉक्टरांनी त्याला स्वत:च्या हातानं जेवण भरवलं आहे.

  • Share this:

मुंबई, 05 एप्रिल : कोरोना व्हायरसचा संसर्ग झपाट्यानं वाढत आहे. भारतात आतापर्यंत 3300 तर महाराष्ट्रात सर्वात जास्त 661 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना दिवसेंदिवस भयावह रुप धारण करतो आहे. अशातच कोरोनाग्रस्तांवर उपचार करण्यासाठी आलेल्या डॉक्टरांना मारहाण करण्याचे प्रकार देशात घडत आहेत. त्यामुळे कोरोनाग्रस्तांवर उपचार करण्यासाठी डॉक्टर धास्तावत आहेत. एकीकडे कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झाल्यानंतर त्याला रुग्णवाहिकेपर्यंत नेण्यासाठी डॉक्टर आणि स्टाफ तयार होत नव्हता. अनेक ठिकाणी मृतदेह पाण्यासाठी नातेवाईक नकार देत असतानाही अनेक चांगल्या गोष्टीही घडत आहेत.

एकीकडे अशी परिस्थिती असतानाही माणुसकीला पाझर फुटणारा एका फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णाला नातेवाईकांनी किंवा कुटुंबियांनी येऊन जेवण भरवणं अपेक्षित असतं. मात्र इथे ते न आल्यामुळे डॉक्टर उपचार करण्यासोबतच ही जबाबदारी पार पडत असल्याचं दिसून आलं आहे. एका रुग्णाचे नातेवाईक न आल्यानं चक्क डॉक्टरांनीच त्याला भरवल्याचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

हे वाचा-राज्यातील सर्वाधिक कोरोना रुग्ण मुंबईत, काय आहे हॉस्पिटलची स्थिती, पाहा PHOTOS

या फोटोमध्ये आपण पाहू शकता हा रुग्ण कोरोनाग्रस्त नाही परंतु या रुग्णाला खूप लागलं आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. अशावेळी त्याच्या जवळ नातेवाईकांनी असणं अपेक्षित असताना ती जबाबदारी डॉक्टरांनी पार पाडली आहे. डॉक्टरांनी आपली कर्तव्य बजावत असताना उपचारासोबत दाखवलेली माणुसकी हा सध्या चर्चेचा विषय झाला आहे. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर युझर्स आणि अनेक लोकांनी या डॉक्टरचं कौतुक केलं आहे. काळजाचा ठाव घेणारा हा फोटो अरुण जनार्धनन यांनी आपल्या ट्वीटर अकाऊंटवर शेअर केला आहे. ते लिहितात, 'जर रुग्णाचे नातेवाईक येऊ शकले नाहीत तर डॉक्टर (मद्रास मेडिकल मिशनचे ज्येष्ठ नेफ्रोलॉजिस्ट) जॉर्जिया अब्राहम यांनी रुग्णाला आपल्या हाताने जेवण भरवलं आहे.' ह्या फोटोला 6 हजारहून अधिक लोकांनी लाईक केलं आहे तर हजारहून अधिक लोकांनी कमेंट्स केल्या आहेत.

हे वाचा-लॉकडाऊनमध्ये धक्कादायक प्रकार, मुलीने सांगितलं 'पप्पांनी आईला मारून टाकलं'

First published: April 6, 2020, 12:07 AM IST

ताज्या बातम्या