• Home
 • »
 • News
 • »
 • news
 • »
 • पोलीस चौकीवर RSS कार्यकर्ते तैनात? व्हायरल झालेल्या फोटोवरून वाद चिघळला

पोलीस चौकीवर RSS कार्यकर्ते तैनात? व्हायरल झालेल्या फोटोवरून वाद चिघळला

अधिकाऱ्यांनी रविवारी दिलेल्या माहितीनुसार, स्वयंसेवकांना असं करण्याची परवानगी देण्यात आली नव्हती आणि त्यांना तेथून निघून जाण्यास सांगितले होतं. तर आरएसएसने या बातमीला खोटं असल्याचं म्हटलं आहे.

 • Share this:
  हैदराबाद, 13 एप्रिल : तेलंगणाच्या पोलीस चौकीवर कथित स्वरुपात आरएसएस कार्यकर्ते तैनात केल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर वाद चिघळला आहे. ज्यामुळे एका पोलीस निरीक्षकाला तेथून हटवण्यास आले. अधिकाऱ्यांनी रविवारी दिलेल्या माहितीनुसार, स्वयंसेवकांना असं करण्याची परवानगी देण्यात आली नव्हती आणि त्यांना तेथून निघून जाण्यास सांगितले होतं. तर आरएसएसने या बातमीला खोटं असल्याचं म्हटलं आहे. ते म्हणाले की, कार्यकर्ते पोलीस चौकीवर ओळखपत्र तपासत होते. संघाने म्हटले आहे की, ही बातमी 'संकुचित आणि स्वार्थी हितसंबंधांनी' प्रसिद्ध केली आहेत. सोशल मीडियावर फिरत असलेल्या फोटोंमध्ये आरएसएसचे स्वयंसेवक कोरोना व्हायरस लॉकडाऊन दरम्यान यादद्री भोंगिर जिल्ह्यातील एका चौकीवर तैनात असल्याचं दिसतात. यावर अनेकांनी सोशल मीडियावर आक्षेप घेतला आहे. चौकीवरून प्रवास करणाऱ्या लोकांची कागदपत्रे तपासण्यासाठी आरएसएसच्या कार्यकर्त्यांना 'काठी घेऊन' परवानगी कोणी दिली, असा सवाल त्यांनी केला. तसेच त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. 'आम्हाला वाचवा नाहीतर...', पाकचे पंतप्रधान इमरान खान यांनी जगासमोर मागितली भीक मजलिस बचाओ तहरीक पक्षाचे प्रवक्ते अमजद उल्ला खान यांनी मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्याकडे या संदर्भात स्पष्टीकरण मागितले. त्यावर ते म्हणाले की, हे टीआरएस सरकारचे सॉफ्ट हिंदुत्व धोरण आहे की आरएसएस समर्थक आणि तेलंगणाचे सरकारी अधिकारी त्यांच्या स्वतंत्र इच्छेनुसार असे करत आहेत? असा सवाल त्यांनी केला. तथापि, पोलिसांनी सांगितले की, गेल्या आठवड्यात काही महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी साध्या कपड्यांमध्ये स्वेच्छेने काम केले आणि पोलिसांना काही चौक्यांवर अन्न व पाणी वाटप करण्यास मदत केली. धारावीत कोरोनाचा कहर! गेल्या 12 तासात 4 नव्या रुग्णांची नोंद, एकाचा मृत्यू एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, अचानक ते सर्व 9 एप्रिलला आरएसएसच्या गणवेशात आले आणि त्यानंतर त्यांनी चौकीजवळ काही फोटो काढले. यानंतर त्याला तेथून जाण्यास सांगण्यात आले. त्यानंतर पोलीस निरीक्षक यांना दुसर्‍या ठिकाणी पाठविण्यात आले आणि मुख्यालयाला कळविण्यात आले. यासंदर्भात अद्याप कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही, असे ते म्हणाले. तेलंगणचे राज्य सचिव के. रमेश म्हणाले की, संघाचे कार्यकर्ते प्रशासनाच्या कामात हस्तक्षेप करत नाहीत आणि पूर्ण परवानगी मिळाल्यानंतरच त्यांचे काम करतात. रस्त्यावर तुफान वेगात कारने फिरत होता नकली IAS, पोलिसांनी चौकशी करताच ओकलं सत्य संपादन - रेणुका धायबर
  Published by:Manoj Khandekar
  First published: