कल्याण-डोंबिवलीत कोरोनाचा धोका वाढला, 5 नवीन रुग्ण; एकूण संख्या पोहचली 43वर

कल्याण-डोंबिवलीत कोरोनाचा धोका वाढला, 5 नवीन रुग्ण; एकूण संख्या पोहचली 43वर

कल्याण-डोंबिवलीतही वेगाने कोरोना पसरत आहे. 5 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.

  • Share this:

कल्याण, 09 एप्रिल : मुंबईत दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या वाढ होत आहे. असे असताना कल्याण-डोंबिवलीतही वेगाने कोरोना पसरत आहे. कल्याण-डोंबिवलीत कोरोनाच्या रुग्णात वाढ झाली. 5 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यातील डोंबिवलीमधील 3, तर कल्याणमधील 2 रुग्ण आहे. यासह कल्याण-डोंबिवलीतील रुग्णांची संख्या 43वर पोहचली आहे.

या पाचही रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे असल्यामुळे त्यांची चाचणी करण्यात आली होती. आता पाचही रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहे.

आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत घरोघरी जाऊन सर्वेक्षण चालू असून नागरिकांनी घाबरून न जाता सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणे आढळून आल्‍यास त्‍वरीत महापालिकेच्‍या रूग्‍णालयाशी संपर्क साधावा, महापालिकेच्या आरोग्य पथकास सहकार्य करावे तसंच अधिक माहितीकरीता बाई रूक्‍मिणीबाई रूग्‍णालय, कल्‍याण येथील 0251- 2310700 व शास्‍त्रीनगर सामान्‍य रूग्‍णालय, डोंबिवली येथील 0251- 2481073 व 0251- 2495338 या हेल्‍पलाईनवर संपर्क साधावा, असं आवाहनही महापालिकेमार्फत करण्यात आले आहे.

मुंबईत अवघ्या 12 तासांत कोरोनाचे 143 नवे रुग्ण

महाराष्ट्रात कोरोनाबाधितांच्या संख्येत प्रचंड वेगाने वाढ होत असून आता कोरोना रुग्णांची संख्या 1297 एवढी झाली आहे. चिंताजनक बाब म्हणजे राजधानी मुंबईत अवघ्या 12 तासांत 143 नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. लोकसंख्येची जास्त घनता असलेल्या मुंबईत कोरोनाचा संसर्ग वाढत चालल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. ताज्या माहितीनुसार, पुणे, औरंगाबाद येथे प्रत्येकी 3, कल्याण डोंबिवलीध्येही 5 रुग्णांची वाढ झाली आहे. तर मीरा-भाईंदर, वसई-विरार, सिंधुदुर्ग, ठाणे, यवतमाळ या भागात प्रत्येकी एक असे एकूण 162 रुग्ण 12 तासांत वाढले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा आता एकूण 1297 झाला आहे.

वाचा-'फॉल्स निगेटिव्ह'ने वाढवली सरकारची चिंता, भारतासाठी धोक्याची घंटा

वाचा-बंदीनंतरही दीड लाख तबलिगी आले एकत्र, संपूर्ण देशात असा फुटला कोरोनाचा टाईम बॉम्ब

महापौरांना करायची आहे पुन्हा रुग्णसेवा

दुसरीकडे, केडीएमसीच्या महापौर विनिता राणे यांना पुन्हा रुग्ण सेवा करायची आहे. महापौर नगरसेविका होण्याआधी मुंबई महानगर पालिकेच्या बी.वाय.एल नायर रुग्णालयात 32 वर्षे परिचारिका म्हणून काम केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनानंतर महापौर विनिता राणे यांनी पुन्हा रुग्ण सेवा करण्याची इच्छा दर्शवली आहे. तसे पत्र सुद्धा आयुक्तांना देऊन कायदेशीर अनुमती सुद्धा मागितली आहे. महापौर यांनी सांगितले की, त्यांच्याकडे रुग्णसेवेचा प्रदीर्घ अनुभव माझ्या गाठीशी आहे. सध्याच्या परिस्थिती माझ्या वैद्यकीय क्षेत्रातील माझे सर्व सहकारी डॉक्टर्स परिचरिका रुग्णालयातील सर्व स्टाफ जिवाची पर्वा न करता अहोरात्र काम करीत असताना मी पेशाने परिचारीका असल्याने माझे मन मला स्वस्थ बसू देत नाही म्हणून मी कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या रुग्णालयातील रुग्णांसाठी सेवा देण्याची माझी इच्छा आहे.

वाचा-मित्राच्या अंत्यविधीला गेला, अन् काही दिवसांतच संपूर्ण देशात पसरला कोरोना

वाचा-मॉब लिंचिंगचा गंभीर प्रकार, कोरोनाच्या संशयावरून लाथा-बुक्क्यांनी तरुणाची हत्या

संपादन-प्रियांका गावडे

First published: April 9, 2020, 12:36 PM IST

ताज्या बातम्या