Home /News /news /

लॉकडाउनमध्ये लग्न! दोन वऱ्हाडींच्या उपस्थितीत केले विधी पण नवरीशिवाय परतले घरी

लॉकडाउनमध्ये लग्न! दोन वऱ्हाडींच्या उपस्थितीत केले विधी पण नवरीशिवाय परतले घरी

लॉकडाउनमुळे दोनच वऱ्हाडींना घेऊन नवरदेव वधुच्या घरी गेला. तिथं विधीवत लग्न झाले मात्र नवरीशिवाय त्यांना परतावं लागलं.

    जोधपूर, 30 मार्च : कोरोनामुळे देशात लॉकडाउन करण्यात आलं आहे. त्यामुळे लोकांना घराबाहेर पडण्यास बंदी आहे. याचा परिणाम अनेक क्षेत्रांवर झाला आहे. तसंच नियोजित कार्यक्रमही यामुळे रद्द करावे लागले आहेत. मात्र, राजस्थानात 29 मार्चला एकाच घरात तीन लग्नं होणार होती. पण लॉकडाउनमुळे त्यातलं एकच लग्न होऊ शकलं. त्यातही फक्त दोनच व्हऱ्हाडी पोहोचले आणि लग्न झालं पण नवरीशिवाय ते परतले. राजस्थानमधील जोधपूरमध्ये अत्यंत साधेपणाने आणि हाताच्या बोटांवर मोजता येतील इतक्या लोकांच्या उपस्थितीत लग्न उरकण्यात आलं. लॉकडाउनमुळं या लग्नसोहळ्याला फक्त दोनच वऱ्हाडी मंडळी आली होती. लग्न तर झालं पण नवरीची पाठवणी मात्र लॉकडाउनमध्ये अडकली. यामुळे आता लॉक़डाउन संपल्यानंतरच तिची पाठवणी होईल. जोधपुरमध्ये रविवारी हा लग्नसोहळा झाला. यामध्ये नवरदेव दोन वऱ्हाडी मंडळी घेऊन गेला होता. नवरीकडचे काही मोजकेच लोक यासाठी उपस्थित होते. लग्नाच्या विधीवेळी वधु वरांनी मास्क घातला होता. लॉकडाउनमुळे नवरीला नवऱ्यासोबत पाठवलं नाही. 14 एप्रिलला वाजत गाजत नवरीची पाठवणी करण्यात येईल. शहरातील लिखमाराम भादू यांच्या तीनही मुलींची लग्न रविवारी होते. मात्र लॉकडाउनमुळे ते रद्द झाले. यातील दोन मुलांकडचे लग्न पुढे ढकलण्यास तयार झाले. तर एका मुलाच्या घरी विधी सुरु झाल्यानं लग्नं करून देणं भाग होतं. शेवटी विधीवत लग्न लावून देण्यात आलं. यावेळी जास्त लोक एकत्र येणार नाहीत याचीही काळजी घेण्यात आली.
    Published by:Suraj Yadav
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या