नवी दिल्ली, 23 मार्च : देशभरात Coronavirus ने आतापर्यंत 9 जणांचा बळी घेतला आहे. कोरोनाग्रस्तांच्या आकड्यात आज मोठी वाढ झाली. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशात आता 497 पॉझिटिव्ह केसेस झाल्या आहेत. कोरोनाव्हायरसमुळे एका तिबेटियन निर्वासिताचा मृत्यू झाला. हा कोरोनाचा नववा बळी ठरला.
हिमालच प्रदेशातल्या रुग्णालयात 69 वर्षांच्या एका व्यक्तीचा आज मृत्यू झाला. तो अमेरिकेला प्रवास करून आला होता. मूळचा तिबेटचा रहिवासी होता.
69 वर्षीय तिब्बती शरणार्थी की आज हिमाचल प्रदेश के टांडा के एक अस्पताल में मृत्यु हो गई। तिब्बती शरणार्थी में #coronavirus पॉजिटिव पाया गया। 15 मार्च को तिब्बती शरणार्थी अमेरिका से लौटा था: राज्य के अतिरिक्त मुख्य सचिव (स्वास्थ्य) आर.डी. धीमान
आतापर्यंत या विषाणूने जगभरात 15000 हून अधिक बळी घेतले आहेत. यातले सर्वाधिक मृत्यू युरोपात झाले आहेत. चीनमध्ये केंद्र असलेल्या या Coronavirus मुळे इटली आणि पाठोपाठ स्पेनमध्ये थैमान घातलं आहे. भारतातही हा विषाणू भराभर पसरत आहे.
Coronavirus पश्चिम महाराष्ट्रात पसरला, 8 नव्या रुग्णांसह संख्या 97 वर
Coronavirus चा धोका महाराष्ट्रात वाढतोच आहे. सोमवारी संध्याकाळी आरोग्य मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात 8 नवे पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रातून या नव्या केसेस समोर आल्या आहेत. सांगलीत 4 कोरोनाबाधित रुग्ण उघड झाल्याने खळबळ उडाली आहे.
महाराष्ट्र सरकारने कोरोनाव्हायरसशी मुकाबला करण्यासाठी कडक निर्बंध लादले आहेत. संध्याकाळपासूनच राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. पण त्याबरोबरच या विषाणूचा प्रसार आता मोठ्या शहरांपासून महाराष्ट्राच्या निमशहरी आणि ग्रामीण भागात पसरत चालल्याचं उघड होत आहे. सोमवारी संध्याकाळी समोर आलेल्या नव्या केसेसमुळे आता राज्यातल्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 97 वर पोहोचली आहे. यात 3 रुग्ण मुंबईत सापडले आहेत तर बाकीच्या पॉझिटिव्ह केसेस सांगली आणि साताऱ्यातील आहेत.