राज्यात कोरोनाचा हाहाकार सुरूच, अशी आहे आजची आकडेवारी

राज्यात कोरोनाचा हाहाकार सुरूच, अशी आहे आजची आकडेवारी

आतापर्यंत राज्यात रुग्ण बरं होण्याचं प्रमाण 55 टक्के आहे. राज्यात करोना मृत्यु प्रमाण 4.19 टक्के आहे तर एकूण केलेल्या चाचण्यात पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या 18 . 86 टक्के इतकी आहे.

  • Share this:

मुंबई, 09 जुलै : कोरोनाचे धोका (Coronavirus) दिवसेंदिवस वाढतच आहे. राज्यात गेल्या 24 तासांमध्ये 6 हजार 875 कोरोना रुग्ण समोर आले आहेत. तर 219 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यात एकूण रुग्णांची संख्या 2 लाख 30 हजार 599 वर पोहोचली आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत राज्यात रुग्ण बरं होण्याचं प्रमाण 55 टक्के आहे. राज्यात करोना मृत्यु प्रमाण 4.19 टक्के आहे तर एकूण केलेल्या चाचण्यात पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या 18 . 86 टक्के इतकी आहे.

काल राज्यात 24 तासांमध्ये उच्चांकी 6603 रुग्णांची (Covid-19 Patient ) भर पडली होती तर 198 जणांचा मृत्यू झाला होता. राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्यानं प्रशासनही हादरलं आहे. नागरिकांमध्ये कोरोनाचा मोठी दहशत निर्माण झाली आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे.

गणेशोत्सवानिमित्त मोठा निर्णय, या तारखेनंतर सिंधुदुर्गात प्रवेश नाही

राज्यात आता कोरोना लक्षणविरहीत नागरिकांचीही टेस्ट केली जाणार आहे, अशा माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. राज्यातील नागरिकांच्या जास्तीत जास्त टेस्ट कराव्यात, अशा सूचना केंद्र सरकारनं दिल्या आहे. त्यामुळे आता प्रिस्क्रीपशन शिवाय देखील कोरोना टेस्ट केल्या जाणार आहेत, असंही आरोग्य मंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.

पुण्यात तळीरामांनी दारू पिण्यासाठी शोधली स्मशानभूमी, अशा चालतात पार्ट्या

दरम्यान, कोरोनावर लवकरच औषध सापडलं नाही तर भारतात भयावह परिस्थिती निर्माण होऊ शकते. फेब्रुवारी 2021 पासून भारतात दररोज 2.87 लाखांच्या जवळपास नवे रुग्ण आढळून येऊ शकतात असा रिपोर्ट जगविख्यात MIT (Massachusetts Institute of Technology)ने दिला आहे.

शिवसेनेत घडामोडींना वेग, मुख्यमंत्र्यांनी बोलावली सर्व मंत्र्यांची तातडीची बैठक

जगभरातल्या 84 देशांच्या टेस्टिंग आणि कोरोना रुग्णांचा अभ्यास करून MITच्या तज्ज्ञांनी हा रिपोर्ट तयार केला आहे. या रिपोर्टनुसार फेब्रुवारी 2021पासून भारतात दररोज तीन लाखांच्या जवळपास रुग्ण येऊ शकतात. असं झालं तर ते फार मोठं संकट असेल आणि जगात भारत सर्वाधिक रुग्णांचा देश बनेल असंह या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.

Published by: Renuka Dhaybar
First published: July 9, 2020, 7:48 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading