Coronaच्या नावे तयार केली फेक ऑडिओक्लीप, नागपूर पोलिसांनी अशी केली कारवाई

Coronaच्या नावे तयार केली फेक ऑडिओक्लीप, नागपूर पोलिसांनी अशी केली कारवाई

नागपुरात 59 पॉझिटिव्ह आणि 200 पेक्षा जास्त संशयित लोक असल्याची ऑ़डिओक्लीप तयार करून व्हायरल केली आहे.

  • Share this:

नागपूर, 27 मार्च : देशभरात कोरोनानं थैमान घातलं आहे. कोरोनासोबतच सोशल मीडियावरून अफवांनाही पेव फुटलं आहे. आतापर्यंत देशभरात कोरोनाचे 700 हून अधिक रुग्ण आढळले आहेत तर 17 आतापर्यंत मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत 135 रुग्ण आढळले आहेत. त्यातच अनेक सोशल मीडियावर अफवांना पेव फुटलं आहे. एक फेक ऑडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ तयार करून व्हायरल केल्या प्रकरणी नागपूर पोलिसांनी सायबर सेलच्या मदतीनं 3 जणांना अटक केली आहे. या तिघांवरही नागपूर पोलीस आयुक्त डॉ भूषणकुमार उपाध्याय यांच्या टीमनं फेक ऑडिओ क्लीप व्हायरल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. आज त्यांना कोर्टात हजर करण्यात येणार आहे.अमित पारधी, जय गुप्ता अशी ही ऑडिओ क्लीप बनवणाऱ्या तरुणांची नावं आहेत. तर मिश्रा अडनावाच्या तरुणानं ही क्लीप सोशल मीडियावर व्हायरल केली आहे. ही क्लीप व्हायरल झाल्यानंतर नागपुरात मोठी खळबळ उडाली होती.

हे वाचा-फिरायला गेले आणि अडकून बसले; पैसेही संपत आले, महिला पर्यटकांना कोसळलं रडू

4.25 मिनिटांची ही ऑडिओक्लीप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये दोन तरुणांमधील संभाषण आहे. त्यामध्ये पहिला तरुण कोरोनाची माहिती सांगत आहे. नागपुरात 59 कोरोनाग्रस्त रुग्ण आहेत आणि 200 हून अधिक संशयित लोक असल्याचा दावा हा करून करत आहे. मेडिकलमधील 3 डॉक्टरांचाही समावेश आहे. त्यातील एक डॉक्टर व्हेंटिलेटरवर असल्याचंही हा तरुण दावा करत आहे. याशिवाय नागपूरमधील लॅबोरेट्रीजमध्ये योग्य टेस्ट होत नसल्याचे आरोपही त्याने केले आहेत. असे अनेक आरोप आणि दावे या तरुणानं या फेक ऑडिओक्लीपमधून केले आहेत. ही क्लीप व्हायरल झाल्यानंतर नागपूर पोलीस आयुक्त डॉ भूषणकुमार उपाध्याय यांच्या टीमनं सायबर सेलच्या मदतीनं तीन जणांना अटक केली आहे.

नागपुरात आज आणखी 05 रुग्ण पॉझिटीव्ह आढळले आहेत. नागपुरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही 9 वर पोहोचली आहे. सोशल मीडियावरून येणारे व्हिडीओ, ऑडिओ क्लीप, मेसेज सत्य तपासल्याशिवाय फॉरवर्ड करू नयेत. तसेच अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी प्रशासन आणि पोलिसांना सहकार्य करावं असं आवाहन नागपूर पोलिसांनी केलं आहे.

हे वाचा-कुशीत 3 महिन्याचं लेकरू आणि अजून आठवडाभर चालणं, डोळ्यांत अश्रू आणणारी कहाणी

First published: March 27, 2020, 1:46 PM IST

ताज्या बातम्या