Home /News /news /

भारतात कोरोनाचा धोका वाढला! आणखी 2 राज्यांमध्ये पोहोचला व्हायरस, IT इंजिनीअरला विषाणूची लागण

भारतात कोरोनाचा धोका वाढला! आणखी 2 राज्यांमध्ये पोहोचला व्हायरस, IT इंजिनीअरला विषाणूची लागण

कर्नाटक (Karnataka) आणि पंजाबमध्ये (Pujnab) प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे. त्यामुळे भारतातील कोरोनाव्हायरस (Coronavirus in india) रुग्णांची संख्या आता 45 वर पोहोचली आहे.

    बंगळुरू, 09 मार्च : भारतात कोरोनाव्हायरसचा (Coronavirus) धोका वाढला आहे. आता आणखी 2 राज्यांमध्ये कोरोनाव्हायरसचे रुग्ण आढळून आलेत. कर्नाटक (Karnataka) आणि पंजाबमध्ये (Punjab) कोरोनाव्हायरसचा प्रत्येकी एक रुग्ण सापडला आहे. त्यामुळे भारतातील एकूण कोरोनाव्हायरस रुग्णांची संख्या आता 45 वर पोहोचली आहे. कर्नाटकच्या बंगळुरूत (Bengaluru) एका आयटी इंजिनीअरला कोरोनाव्हायरसची लागण झाली आहे. कर्नाटकातील हा पहिला रुग्ण आहे. कर्नाटकचे वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, "कोरोनाव्हायरस पॉझिटिव्ह असलेला हा रुग्ण पत्नी आणि मुलीसह यूएसमधून 1 मार्चला भारतात आला. 5 मार्चपासून त्याच्यामध्ये कोरोनाव्हायरसची लक्षणं दिसून आली, आता त्याला कोरोनाव्हायरस असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्याच्यासह प्रवास करणाऱ्या व्यक्तींनाही वेगळं वैद्यकीय देखरेखीत ठेवण्यात आलं आहे" तर पंजाबमध्येही कोरोनाव्हायरसचा पहिला रुग्ण सापडला आहे. हा रुग्ण इटलीहून भारतात परतला आहे. पंजाबचे मुख्य सचिव (आरोग्य) अनुराग अग्रवाल यांनी सांगितलं की, 'एअर इंडियाच्या विमानानं हा कोरोनाग्रस्त रुग्ण इटलीच्या मिलानहून भारतात आला. कुटुंबातील अन्य 2 व्यक्तींसह हा रुग्ण 4 मार्चला अमृतसर विमानतळावर पोहोचला. तपासणीत त्याला कोरोनाव्हायरस असल्याचं स्पष्ट झालं. ' याआधी केरळ, दिल्ली, उत्तर प्रदेश, जम्मू-काश्मीरमध्ये कोरोनाव्हायरसचे रुग्ण आढळून आलेत. केरळमधील सुरुवातीच्या 3 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. संबंधित - धक्कादायक! कोट्यवधी लोकांच्या जीवावर उठणार कोरोना, लाखो भारतीयांचा होणार मृत्यू
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या