Coronavirus in India: गेल्या 24 तासांत कोरोनाचा कहर, वाचा आजची धक्कादायक आकडेवारी

Coronavirus in India: गेल्या 24 तासांत कोरोनाचा कहर, वाचा आजची धक्कादायक आकडेवारी

भारतात आतापर्यंत 15301 लोकांचा मृत्यू झाला आहे. एकूण 2,85,637 लोकांना कोरोनावर मात करून ते बरे झाले आहेत. सध्या देशात 1,89,463 सक्रिय प्रकरणं आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 26 जून : देशात कोरोनाचा हाहाकार वाढत चालला असताना गेल्या 24 तासातही कोरोनाचा प्रकोप पाहायला मिळाला. देशात गेल्या 24 तासांत 17,296 कोरोना विषाणूची नवीन प्रकरणं नोंदवली गेली आहेत आणि 407 लोकांचा मृत्यूही झाला आहे. या आकडेवारीमुळे कोरोनाच्या संक्रमित लोकांची एकूण संख्या 4,90,401 वर पोहोचली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, भारतात आतापर्यंत 15301 लोकांचा मृत्यू झाला आहे. एकूण 2,85,637 लोकांना कोरोनावर मात करून ते बरे झाले आहेत. सध्या देशात 1,89,463 सक्रिय प्रकरणं आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांमध्ये महाराष्ट्रात कोरोनाची 4,841 नवीन प्रकरणं समोर आली आहे. ज्यामुळे राज्याचा एकूण कोरोनाचा आकडा 1,47,741 वर पोहोचला आहे. त्याचवेळी मृतांची संख्या 6,931 वर पोहोचली आहे. या संबंधी आरोग्य विभागाकडून माहिती देण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील शहीद वीरपुत्रांवरून शिवसेनेची भाजपवर जहरी टीका, म्हणाले...

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात आणखी 192 रुग्णांचा मृत्यू झाला आहे त्यामुळे एकूण मृतांचा आकडा हा 6,931 वर पोहोचला आहे. या 192 मृत्यूंपैकी गेल्या 48 तासांत 109 रुग्णांचा मृत्यू झाला तर उर्वरित 83 जण यापूर्वी मरण पावले आहेत. दरम्यान, गेल्या 24 तासांमध्ये 3,661 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे, त्यामुळे कोरोनाच्या एकूण बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या 77,453 वर गेली आहे.

मागच्या 24 तासांत सगळ्यात जास्त कोरोनाची प्रकरणं

महाराष्ट्र : 4841

दिल्ली: 3390

तामिळनाडू: 3509

तेलंगाना: 920

उत्तर प्रदेश: 636

इंदुरीकर महाराजांच्या अडचणी वाढल्या, 'त्या' विधानावरून अखेर गुन्हा दाखल

मृतांचा आकडा

महाराष्ट्र: 192

दिल्ली: 64

तामिळनाडू: 45

गुजरात: 18

उत्तर प्रदेश -15

पश्चिम बंगाल: 15

चहातल्या साखरेमुळं संपवला आयुष्याचा गोडवा, पतीने पत्नीची गळा चिरून केली हत्या

संपादन - रेणुका धायबर

First published: June 26, 2020, 10:04 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading