बक्सर, 09 ऑगस्ट : एका संशयातून पतीनं सगळ्या सीमा ओलांडत भररस्त्यात आपल्या पत्नीची निर्घृण हत्या केली आहे. कौटुंबिक वादातून पतीनं भररस्त्यात धारदार चाकूनं पत्नीवर वार केले. ही धक्कादायक घटना बिहारच्या बक्सर परिसरात घडली आहे. ब्रह्मपुरी इथे राहणाऱ्या दाम्पत्यात खटके उडत होते. रागाच्या भरात पतीनं रस्त्यावर पत्नीच्या मानेवर चाकू फिरवून शीर धडापासून वेगळं केलं. रस्त्यावर हत्येचा थरार घडल्यानं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पती-पत्नीमध्ये रस्त्यावर वाद सुरू झाला. रागाच्या भरात पतीनं फरफटत नेण्याचा प्रयत्न केला. पत्नी ऐकत नाही हे पाहून त्याचा संताप अनावर झाला आणि रागाच्या भरात त्यानं धारदार शस्रानं मानेवर वार करून शीर आणि धड वेगळं केलं. हे दाम्पत्य ब्रह्मपुरी पोलीस ठाणा क्षेत्राच्या हद्दीत येत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली. हा संपूर्ण प्रकार संपत्ती, मालमत्ता आणि कौटुंबिक वादातून झाल्याचंही स्थानिकांचं म्हणणं आहे.
हे वाचा-साऱ्या जगाला आशा देणारी ऑक्सफर्डची कोरोना लस शास्त्रज्ञांमुळेच अडचणीत
अलागु यादव दिल्लीतील एक कंपनीत नोकरी करायचा. लॉकडाऊनमुळे नोकरी सुटली आणि तो घरी आला. अनेक महिन्यांपासून त्याचा आपल्या पत्नीसोबत वाद होता. काही ना काही कारणांवरून सतत कुरबुरी सुरू होत्या. त्याने पत्नीच्या चारित्र्यावरही अनेक प्रश्न उपस्थित केले. पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा संशय आणि राग त्याच्या मनात होता. या संशयातूनच पतीनं हे पाऊल उचललं असावं असं स्थानिकांचं म्हणणं आहे.