मुंबई, 03 जुलै: आपला जीव धोक्यात घालून कोरोना वॉरियर म्हणून काम करणाऱ्या डॉक्टरांनी कोरोनाच्या महासंकटात महत्त्वाची भूमिका आहे. कोविड-19 विरोधात लढण्यासाठी आघाडीवर असलेल्या डॉक्टरांचे अनेक व्हिडीओ गेल्या काही दिवसांमध्ये सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. कोरोनाच्या काळात आपल्या सहकाऱ्यांचा ताण कमी करण्यासाठी एक डॉक्टरनं पीपीई सूटमध्ये नोरा फतेहीच्या गाण्यावर तुफान डान्स केला आहे.
मुंबईतील डॉ. रिचा नेगी यांनी पीपीई सूट घालून हाय गरमी या नोराच्या गाण्यावर तुफान डान्स केला. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा डान्स पाहून युझर्सही हैराण झाले. पीपीई सूटमधील हा डान्स रिचा यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. आपल्या सहकाऱ्यांचं मनोरंजन करण्यासाठी आणि नकारात्मकता घालवण्यासाठी त्यांनी डान्स केल्याचं सांगितलं आहे.
हा व्हिडीओ पोस्ट करताना त्यांनी कॅप्शनमध्ये म्हटलं आहे की, 'मला हे गाणं खूप आवडतं. हे गाणं पीपीई सूट घातलेल्या डॉक्टरांसाठी एकदम परफेक्ट आहे असं मला वाटतं' हा व्हिडीओ साधारण 4 लाखहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तर युझर्सनी कोरोना वॉरियर्स आणि डॉक्टरला सलाम म्हणत या व्हिडीओला लाईक केलं आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
संकलन, संपादन- क्रांती कानेटकर