• Home
 • »
 • News
 • »
 • news
 • »
 • कोरोनातून लेकीला वाचवणाऱ्या डॉक्टरचे मानले आभार, बापानं दिलेलं 10 लाखांचं बक्षीस नाकारलं

कोरोनातून लेकीला वाचवणाऱ्या डॉक्टरचे मानले आभार, बापानं दिलेलं 10 लाखांचं बक्षीस नाकारलं

सॅल्युट! लेकीसारखी काळजी घेणाऱ्या डॉक्टरनं नाकारलं 10 लाखांचं बक्षीस, काय आहे कारण

 • Share this:
  धुळे, 11 ऑगस्ट : कोरोनाच्या काळात मदतीचा हात किती महत्त्वाचा आहे याची जाणीव होत आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांना 14 दिवस पूर्ण वेगळं ठेवलं जात जिथे एकदाही भेटता येऊ शकत नाही. अशा परिस्थितीत आपल्या पोटचा गोळा आणि जीव असलेल्या वडिलांना मुलीपासून वेगळं राहाणं किती अवघड होतं. धुळ्यात अवघ्या 19 वर्षांच्या तरुणीला कोरोनाची लागण झाल्याचं काळताच बापाच्या काळजात धस्स झालं. डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी या तरुणीला रुग्णालयात उपचारासाठी नेलं आणि कुटुंबियांना क्वारंटाइन केलं. या घटनेनंतर आपल्या मुलीचं काय होईल या विचारानं बांध फुटला. इच्छा असूनही मुलीला पुढचे काही दिवस भेटता येणार नव्हतं. आपल्याला घरासारखी काळजी घेणारं कुणी नाही या विचारानं तरुणीला अस्वस्थ झालं. घरच्यांपासून इतकं दूर राहण्याची वेळ कधी आली नव्हती. तिची अस्वस्थता पाहून आरोग्य निरीक्षक सुनील पुंड यांना राहवलं नाही. त्यांनी तरुणीला धीर दिला आणि तिची मुलीसारखी काळजी घेतली. हे वाचा-SSR Death Case : नवे वळण, सुशांतच्या वडिलांचा रिया-श्रुतीला केलेला 'तो' मेसेज.. कोरोनाचे उपचार पूर्ण होईपर्यंत सुनील पुंड यांनी या तरुणीची वडिलांप्रमाणे काळजी घेतली. घरातून जेवणाचा येणारा गरम डबाही तिला खायला दिला. तिला काय हवं नको ते आपलं काम सांभाळून पाहात होते. या तरुणीला मायेचा आधार दिला. त्यामुळे तरुणीनं कोरोनावर यशस्वीपणे मात केली. आपली मुलगी कोरोनाच्या महासंकटातून सुखरूप बाहेर पडली हे ऐकून वडिलांना अश्रू अनावर झाले. तरुणीच्या वडिलांनी डॉक्टरांना तुम्हीच देव असल्याचं म्हणत माझ्या मुलीला वाचवलं त्यासाठी ही मायेची परतफेड म्हणत 10 लाख रुपयांचा चेक समोर ठेवला. यापैकी तुम्हाला हवे तेवढे घ्या असं म्हणत त्यांनी डॉक्टरसमोर हात जोडले. हे वाचा-घरातल्या कामांतून वेळ मिळेना; गृहिणींनी स्वत:ला कसं ठेवावं फिट दिव्य मराठीनं दिलेल्या वृत्तानुसार सुनील पुंड यांनी मात्र त्यांची समजूत काढली आणि मला पैसे नकोत. माझं हे कर्तव्य असल्याचं सांगितलं. मी हिची माझ्या मुलीसारखी काळजी घेतली यातच मला समाधान आहे असंही ते म्हणाले. वडिलांना हे ऋण कसे फेडावे हे समजेना मात्र डॉक्टरांनी त्यांची समजूत काढली. बक्षिसापेक्षा शासकीय सेवेतून मिळणारं समाधान खूप मोठं आहे असंही यावेळी डॉ. सुनील पुंड म्हणाले.
  Published by:Kranti Kanetkar
  First published: