कोरोनामुक्त रुग्णही पसरवू शकतात संक्रमण; नव्या संशोधनामुळे आता चिंता वाढली

कोरोनामुक्त रुग्णही पसरवू शकतात संक्रमण; नव्या संशोधनामुळे आता चिंता वाढली

महाराष्ट्रात गेले दोन दिवस कोरोनामुक्त रुग्णांची संख्या वाढली आहे. मात्र तरी संक्रमणाचा धोका कायम आहे.

  • Share this:

मुंबई, 05, ऑक्टोबर : सलग दोन दिवस महाराष्ट्रात (maharashtra) कोरोना मुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. रविवारी 15 हजारपेक्षा अधिक रुग्णांनी कोरोनावर मात केली. देशातही 55 लाखांपेक्षा अधिक कोरोना रुग्ण बरे झाले आहेत. ही दिलासादायक बातमी असताना आता एक चिंताजनक बातमी येते आहे. ती म्हणजे कोरोनातून बरे झालेले रुग्णही कोरोना पसरवू शकतात. या रुग्णांच्या शरीरात काही दिवस कोरोनाव्हायरस असतो. त्यामुळे हे रुग्ण बरे झाले तरी त्यांच्यामार्फत कोरोना पसरू शकतो, असं संशोधकांनी म्हटलं आहे.

अमेरिकेत बऱ्या झालेल्या कोरोना रुग्णांचा अभ्यास करण्यात आला. कोरोनावर मात केलेल्या गंभीर रुग्णांच्या शरीरात कोरोनाव्हायरस 90 दिवस म्हणजे तब्बल तीन महिन्यांपर्यंत राहतो.

अमेरिकेतील सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनने दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या गंभीर अवस्थेतून बाहेर पडलेले रुग्ण 90 दिवसांपर्यंत कोरोना संक्रमण पसरवू शकतात. ज्या रुग्णांमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणं असतात असे रुग्ण बरे झाल्यानंतरही त्यांच्या शरीरात 10 दिवस कोरोनाव्हायरस असतो.  असे रुग्ण रोगप्रतिकारक शक्ती कमजोर असलेल्या व्यक्तींच्या संपर्कात आल्यास त्यांच्या संक्रमणाची शक्यता वाढते. त्यामुळे कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांनी जास्त घराबाहेर पडू नये, असा सल्ला देण्यात आला आहे.

हे वाचा - कोरोना लशीत रशियाने मारली बाजी! 2 महिन्यांतच लाँच करणार दुसरी CORONA VACCINE

महाराष्ट्रात सध्या 13 हजार 702 नवे रुग्ण आढळून आलेत. तर दिवसभरात 326 जणांचा मृत्यू झाला. राज्यात सध्या 2 लाख 55 हजार 281 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर रुग्णांची एकूण संख्या ही 14 लाख 43 हजार 409 एवढी झाली आहे.  मुंबईतला रुग्णांचा आकडा हा वाढलेला असून दिवसभरात 2 हजार 109 एवढे नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 48 जणांचा मृत्यू झाला.  पुण्यातही रुग्ण संख्येचा आलेख वाढत असून एकूण संख्या ही दीड लाखांच्या जवळ गेली आहे.

हे वाचा - भारतात कधी आणि कुणाला मिळणार कोरोना लस? केंद्रीय आरोग्यमंत्री काय म्हणाले पाहा

पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 1 लाख 49 हजार 399 एवढी झाली आहे. पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या ही 15 हजार 399 एवढी झाली आहे. कोरोना रुग्णांच्या मृत्यूची एकूण संख्या ही 3 हजार 647 एवढी झाली आहे. तर आत्तापर्यंत 1 लाख 30 हजार 353 जणांनी कोरोनावर मात केली आहे.

Published by: Priya Lad
First published: October 5, 2020, 8:13 AM IST

ताज्या बातम्या