कोरोनाच्या धोक्यामुळे सरकारचा आणखी एक मोठा निर्णय; मॉल्स होणार बंद, फक्त 'ही' दुकाने राहणार सुरू

कोरोनाच्या धोक्यामुळे सरकारचा आणखी एक मोठा निर्णय; मॉल्स होणार बंद, फक्त 'ही' दुकाने राहणार सुरू

राज्यातल्या बाधितांची संख्या 26 वर पोहोचली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

  • Share this:

मुंबई, 14 मार्च : राज्यातल्या कोरोनाग्रस्तांची (covid-19) संख्या वाढत असल्याचं समोर आलं आहे. आता देशात coronavirus चे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. मुंबई, नवी मुंबई आणि यवतमाळमध्ये नवे रुग्ण सापडल्याने राज्यातल्या बाधितांची संख्या 26 वर पोहोचली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

जीवनाश्यक वस्तूंची दुकानं वगळून एसी मॉल बंद रहातील. 31 मार्चपर्यंत हे मॉल बंद ठेवण्याचे आदेश सरकारकडून देण्यात आले आहेत. याआधीच सरकारने जिम, जलतरण तलाव, थिएटर्स बंद करण्याचा निर्णय घेतला होता. तसंच धार्मिक, राजकीय, सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यातच आता वातानुकूलित मॉलही बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आदेशाचं पालन न करणाऱ्यांवर होणार कारवाई

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील थिएटर बंद ठेवण्याचे आदेश देऊन देखील मुंबईत काही ठिकाणी थिएटर सुरू ठेवण्यात आले आहेत. 'जर कोणी आदेश देऊनदेखील थेटर सुरू ठेवत असतील तर राज्य सरकार कारवाई करेल,' अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.

राज्यातल्या सगळ्या शाळांना 31 मार्चपर्यंत सुट्टी जाहीर

कोरोना व्हायरस (Coronavirus) राज्यातील सगळ्या शाळांना ३१ मार्च पर्यंत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. यासंदर्भात राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने परिपत्रक काढलं आहे. सोमवारपासून पुढची सूचना मिळेपर्यंत 31 मार्चपर्यंत शाळा बंद राहतील, असं या परिपत्रकात म्हटलं आहे. कोरोना संदर्भात खबरदारीचा पर्याय म्हणून सगळ्या शाळा बंद करण्यात आल्या आहेत.शासनाच्या, महापालिकेच्या आणि खासगी शाळाही बंद ठेवण्यात येणार आहेत.

दहावी बारावीच्या परीक्षा मात्र ठरलेल्या वेळापत्रकानुसार होतील. यापूर्वी पुणे आणि पिंपरी चिंचवडमधल्या शाळा 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.

First published: March 14, 2020, 9:43 PM IST

ताज्या बातम्या