मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /महाराष्ट्रात कोरोनाचा कहर! नांदेडनंतर ठाणे जिल्ह्यातील आमदार कोरोना पॉझटिव्ह

महाराष्ट्रात कोरोनाचा कहर! नांदेडनंतर ठाणे जिल्ह्यातील आमदार कोरोना पॉझटिव्ह

महाराष्ट्रातील अनेक लोकप्रतिनिधींनी कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त समोर येत आहे

महाराष्ट्रातील अनेक लोकप्रतिनिधींनी कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त समोर येत आहे

महाराष्ट्रातील अनेक लोकप्रतिनिधींनी कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त समोर येत आहे

    ठाणे, 27 जून : महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील एका भाजपा आमदाराला कोरोनाव्हायरसची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. एका नागरी आरोग्य अधिकाऱ्यांनी शनिवारी याबाबत माहिती दिली.

    काही दिवसांपूर्वी 40 वर्षीय आमदाराला कोरोनाची लागण झाली होती आणि सध्या त्यांच्यावर मुंबई येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

    ते म्हणाले की, आरोग्य विभागाचे कर्मचारी भाजप नेत्याच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध घेत आहेत. आणि त्यांना क्वारंटाइन करण्यात येणार आहे. यापूर्वी शनिवारी सकाळी नांदेड जिल्ह्यातील काँग्रेसचा एक आमदार कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले होते.

    हे वाचा-चिनी सैनिकांची आता काही खैर नाही! पूर्व लडाखमध्ये तोडीस तोड देणारी यंत्रणा तैनात

    आमदारांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू

    जिल्ह्यातील एका वरिष्ठ अधिका-याने सांगितले की, नांदेडहून येणारा एक ज्येष्ठ मंत्री संसर्गातून बरा झाल्यानंतर काही दिवसांनी या आमदाराला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. अधिकारी म्हणाले, 'खासगी रुग्णालयात आमदारावर उपचार सुरू आहेत. ते संसर्ग झालेल्या स्थानिक नगरसेवकांच्या संपर्कात आले होते.

    हे वाचा-फक्त आधार क्रमांकाने करु शकता स्वत:च्या कंपनीची नोंदणी; नियमांमध्ये मोठा बदल

    ते म्हणाले की नांदेड जिल्ह्यातील कोविड – 19 रुग्णांची संख्या 248 झाली आहे, तर मृत्यूची संख्या 16 पर्यंत पोहोचली आहे. यापूर्वी महाराष्ट्रातील तीन मंत्र्यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे आढळले होते, ते बरे झाल्यानंतर त्या सर्वांना रुग्णालयातून सोडण्यात आले

    संपादन - मीनल गांगुर्डे

    First published:

    Tags: Corona virus in india