मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

कोरोना योद्ध्याने बेवासर मृतदेहाला दिला खांदा, कर्तव्य पार पाडत उभं केलं प्रेरणादायी उदाहरण

कोरोना योद्ध्याने बेवासर मृतदेहाला दिला खांदा, कर्तव्य पार पाडत उभं केलं प्रेरणादायी उदाहरण

अनेक कोरोना योद्धा विविध प्रकारे लोकांच्या मदतीसाठी धावून जात आहे. त्यांच्या या कर्तृत्वाला सलाम!

अनेक कोरोना योद्धा विविध प्रकारे लोकांच्या मदतीसाठी धावून जात आहे. त्यांच्या या कर्तृत्वाला सलाम!

अनेक कोरोना योद्धा विविध प्रकारे लोकांच्या मदतीसाठी धावून जात आहे. त्यांच्या या कर्तृत्वाला सलाम!

  • Published by:  Meenal Gangurde
दंतेवाडा, 3 मे : कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) संकटात देशात लॉकडाऊन (Lockdown) लागू करण्यात आला आहे. छत्तीसगडमधील नक्षलवादी भागातून पोलिसाचं एका आदर्शवत उदाहरण समोर आले आहे. या जिल्ह्यात बचेली पोलीस ठाण्याच्या प्रमुखांनी काही गावकऱ्यांना एकत्र करीत बेवारस मृतदेहावर अंत्यसंस्कार केला. ठाण्याचे प्रभारी मनीष नागर, स्थानिक नगरसेवक अप्पू कुंजाम आणि जनप्रतिनिधींनी त्या भागातील निराधार महिलेच्या मृतदेहाला खांदा दिला. मिळालेल्या माहितीनुसार, बीना बघेल यांचे शनिवारी रात्री लेबर हार्ट स्कूलमध्ये निधन झाले. याबाबत ठाणे प्रभारी मनीष नागर यांना माहिती मिळाली. बीना बघेल ही महिला गेल्या सहा वर्षांपासून येथील गंगू बघेल या स्थानिक पुरुषासोबत राहत होती. मात्र 3 महिन्यांपूर्वी त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर मात्र बीना एकट्या झाल्या होत्या. गेल्या अनेक दिवसांपासून त्या खूप आजारी होत्या. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. अशावेळी स्थानिकांनी याबाबत मनीष नागर यांना माहिती दिली. अशावेळी मनीष नागर यांनी या निराधार महिलेच्या मृतदेहाला खांदा दिला. सध्या देशातील कोरोनाच्या संकटामुळे लोक मदत करण्यासाठी पुढे येत नाही. लोकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. मात्र असं असलं तरी मनीष यांनी स्थानिकांना एकत्र करीत निराधार महिलेच्या मृतदेहाला खांदा दिला. अशा प्रकारे अनेक कोरोना योद्धा लोकांच्या मदतीसाठी धावून जात आहे. त्यांच्या या कर्तृत्वाला सलाम! संबंधित -प्रसवकळांसह 100 किमी अंतरावर भटकत होती ती, प्रसूतिनंतर धक्कादायक माहिती आली समोर घरात सतत होती मद्यपींची गर्दी, मात्र गरीबीवर मात करीत मुलाने रचला नवा इतिहास  
First published:

पुढील बातम्या