'लिक्विड ऑक्सिजन' आत्मनिर्भरतेचा जालना पॅटर्न; राजेश टोपे यांची मोठी घोषणा

'लिक्विड ऑक्सिजन' आत्मनिर्भरतेचा जालना पॅटर्न; राजेश टोपे यांची मोठी घोषणा

लिक्विड ऑक्सिजन प्लांटमुळे मनुष्यबळ आणि वेळेची बचत होत आहे.

  • Share this:

जालना, 12 सप्टेंबर: राज्यात कोरोना व्हायरसचा (coronavirus)प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. त्यात राज्यात ऑक्सिजनची कमरता भासत असल्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांना आपला जीव गमवावा लागत असल्याचं दुर्दैवी चित्र समोर आलं आहे. 'लिक्विड ऑक्सिजन' आत्मनिर्भरतेचा जालना पॅटर्न मात्र कोरोनाबाधित रुग्णांसाठी नवसंजीवनी ठरताना दिसत आहे.

हेही वाचा..पोलिसांची कमाल! हरवलेल्या मुलाला गुगल मॅपवरून 24 तासांत शोधलं

News 18 लोकमत ने चालविलेल्या श्वास गुदमरतोय मोहिमेची अखेर राज्य सरकारने दखल घेतली आहे. दिवसेंदिवस वाढत असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या पार्श्वभूमीवर आता जिल्हा आरोग्य यंत्रणेनं कंबर कसली आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारासाठी आवश्यक त्या उपाययोजना आणि सोयीसुविधांचा नियोजन करण्यात येत आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा जिल्हा असल्यानं कुठलीही उणीव भासणार नाही याची काळजी घेतली जात आहे. जिल्हा प्रशासनासह आरोग्य यंत्रणेकडून याबाबत कटाक्षानं दक्षताही घेतली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून कोरोनाबाधित रुग्णांच्या व्हेंटिलेटरसाठी लागणाऱ्या ऑक्सिजनसाठी जालन्यात सीएसआरमधून (CSR) मराठवाड्यातील सर्वात मोठा 'लिक्विड ऑक्सिजन' प्लांट उभारण्यात आला आहे. एकाचवेळी 20 हजार किलो साठवणूक क्षमता असून महिको सिड्स कंपनीनं यासाठी सीएसआरमधून 50 लाखांचा खर्च केला आहे.

जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या पटांगणात उभारण्यात आलेल्या या लिक्विड ऑक्सिजन प्लांटमुळे मनुष्यबळ आणि वेळेची बचत होत आहे. ऑक्सिजनचा प्रेशर स्थीर राहून रुग्णांना नवसंजीवनी मिळत आहे. त्यामुळे जालन्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूदरात कमालीची घट झाल्याचं दिसून आलं आहे.

दरम्यान, 'लिक्विड ऑक्सिजन' आत्मनिर्भरतेचा जालना पॅटर्न कोरोनाबाधित रुग्णांसाठी नवसंजीवनी ठरत असून इतर जिल्ह्यांनी देखील याचा आदर्श घेतला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा...चीनचा ढोंगीपणा उघड, कोरोना व्हायरसबद्दल सर्वात धक्कादायक माहिती समोर

काय आहेत वैशिष्टये...?

- 'लिक्विड ऑक्सिजन' प्लांट आत्मनिर्भरतेचा जालना पॅटर्न कोरोना रुग्णांसाठी नवसंजीवनी.

- सीएसआरमधून उभारला मराठवाड्यातील सर्वात मोठा 'लिक्विड ऑक्सिजन' प्लांट.

-एकाचवेळी 20 हजार किलो साठवणूक क्षमता.

-महिको सिड्स कम्पनीने सीएसआर मधून केला 50 लाखाचा खर्च.

दुसरीकडे, राज्यात गेल्या 24 तासांमध्ये तब्बल 24 हजार 886 रूग्ण आढळले आहे. त्यामुळे रूग्णांची एकूण संख्या ही 10 लाख 15 हजार 681 एवढी झाली आहे.  दिवसभरात 393 जणांचा मृत्यू झाला. तर राज्यात शुक्रवारी 14804 जणांना डिस्चार्ज मिळाला. राज्याचा मृत्यू दर हा 2.83वर गेला आहे. राज्यात सध्या 2 लाख 71 हजार 566 रूग्णांवर उपचार सुरू आहेत.

Published by: Sandip Parolekar
First published: September 12, 2020, 12:04 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading