मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /Corona Virus Update : परदेशी पर्यटकांसाठी भारताचे दार तुर्तास बंद, 15 एप्रिलपर्यंत व्हिसा रद्द

Corona Virus Update : परदेशी पर्यटकांसाठी भारताचे दार तुर्तास बंद, 15 एप्रिलपर्यंत व्हिसा रद्द

केंद्र सरकारने  कोरोना व्हायरसपासून खबरदारी घेण्यासाठी परदेशी पर्यटकांना भारतात येण्यास तुर्तास मनाई केली आहे.

केंद्र सरकारने कोरोना व्हायरसपासून खबरदारी घेण्यासाठी परदेशी पर्यटकांना भारतात येण्यास तुर्तास मनाई केली आहे.

केंद्र सरकारने कोरोना व्हायरसपासून खबरदारी घेण्यासाठी परदेशी पर्यटकांना भारतात येण्यास तुर्तास मनाई केली आहे.

मुंबई, 11 मार्च : जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. भारतातही कोरोना व्हायरसमुळे पहिला बळी केरळमध्ये गेला आहे. त्यामुळे आता केंद्र सरकारने कडक पाऊल उचलण्यात सुरुवात केली आहे. भारतात येणाऱ्या परदेशी पर्यटकाने व्हिसा 15 एप्रिलपर्यंत रद्द करण्यात आले आहे. 13 मार्च मध्यरात्रीपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.

केंद्र सरकारने  कोरोना व्हायरसपासून खबरदारी घेण्यासाठी परदेशी पर्यटकांना भारतात येण्यास तुर्तास मनाई केली आहे.  पुढील महिन्यात 15 एप्रिल पर्यंत भारताचा व्हिसा देण्यास नकार दिला आहे. यामध्ये डिप्लोमेटिक, कार्यालयीन व्हिसा, यूएन आणि आंतरराष्ट्रीय संघटना आणि प्रोजेक्ट व्हिसा सोडून सर्व प्रकारच्या व्हिसा रद्द करण्यात आले आहे. या निर्णयाची अंमलबाजवणी 13 मार्चच्या मध्यरात्रीपासून लागू होणार आहे.

15 फेब्रुवरी 2020 नंतर चीन, इटली, इराण, कोरिया गणराज्य, फ्रान्स, स्पेन आणि जर्मनीमध्ये गेलेल्या भारतीयांसह येणाऱ्या सर्व पर्यटकांना 14 दिवस वैद्यकीय तपासणीच्या देखरेखी खाली ठेवण्यात आलं आहे.

महाराष्ट्रात कोरोनाचे 11 रुग्ण

दरम्यान, राज्याची आर्थिक राजधानी मुंबईनंतर आता देशाची उपराजधानी समजल्या जाणाऱ्या नागपूरमध्येही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे.

नागपूरमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला आहे. नागपूरच्या इंदिरा गांधी शासकीय रुग्णालयात या रुग्णाला उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. हा रुग्ण तीन दिवसांपूर्वी अमेरिकेहून नागपुरात आला होता. त्यांची वैद्यकीय तपासणी केली असता अहवालात कोरोना व्हायरस झाल्याचं निदान झालं आहे. त्यामुळे राज्यात आता कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या आता 11 वर पोहोचली आहे. तर, आज संध्याकाळी महाराष्ट्रात कोरोनाचे 10 रुग्ण आढळले आहे. हे 10 जण पॉझिटिव्ह रुग्ण आहेत, पण ते गंभीर नाहीत, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली होती. तसंच अर्थसंकल्पीय अधिवेशनही याच आठवड्यात गुंडाळणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं.

कोरोना व्हायरसबद्दल राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आढावा बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर पत्रकार परिषद घेऊन कोरोना व्हायरसबद्दल राज्य सरकारची भूमिका स्पष्ट करत लोकांना दक्षता घेण्याचं आवाहन केलं आहे.

संपूर्ण जगभरात कोरोना व्हायरसची दहशत आहे. राज्यात 10 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहे. पॉझिटिव्ह रुग्णं आहेत पण ते गंभीर नाहीत. एक ग्रुप परदेशातून राज्यात आला होता. त्यातून हे 10 रुग्ण आढळले. या ग्रुपमधील व्यक्तींचा  ज्यांच्याशी संबध आला आहे. त्यांच्याही तपासणी सुरू आहे. यात दोन जण मुंबईतील आहे तर 8 जण हे पुण्यातील रुग्ण आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

'परदेशातून आलेल्यांनी 14 दिवस घरात राहावे'

कोरोनाच्या परिस्थितीवर सरकार लक्ष ठेवून आहे.  विमानतळांवर तपासणी सुरू आहे. जे परदेशातून आले आहे, त्यांनी घाबरून जाऊ नये. घरी आल्यानंतर निदान 14 दिवस घरातच राहावे, अशी खबरदारीची सुचनाही त्यांनी केली.

'शाळा-कॉलेज बंद करण्याचा अद्याप निर्णय नाही'

शाळा कॉलेज बंद करण्यात येण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाही.  पण, उद्या परिस्थिती काय आहे त्यानुसार निर्णय घेतला जाईल, तशी सुचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. 'अर्थसंकल्पीय अधिवेशन आटोपशीर करून येत्या शनिवारी किंवा रविवारी कामकाज पूर्ण करून सर्व कर्मचारी त्यांच्या कामाच्या ठिकाणी परत जातील.' असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. 'आयपीएलचे सामने प्रेक्षकाविना'

कोरोना व्हायरसची परिस्थिती पाहता राज्यात होत असलेल्या आयपीएलचे सामने हे प्रेक्षकांविना व्हावेत असा प्रस्ताव समोर आला आहे, याबद्दल चर्चा सुरू असून लवकरच निर्णय घेतला जाईल, असंही त्यांनी सांगितलं.

'...म्हणून अधिवेशन आटोपत घेतलं - अजित पवार

Corona Virus Update : परदेशी पर्यटकांसाठी भारताचे दार तुर्तास बंद, 15 एप्रिलपर्यंत व्हिसा रद्द

अधिवेशन शनिवारपर्यंत संपणार आहे. त्यामुळे राज्य भरातून येणारे अधिकारी त्यांना त्यांच्या भागात जिल्ह्यात असणं महत्त्वाचं आहे. त्यासाठी मुख्यमंत्री यांनी सर्व गट नेते विरोधी नेते यांच्याशी चर्चा करून हा निर्णय घेतला. सभागृहानेही मान्य केलं तर इतर महत्त्वाची विधेयकं मंजूर करून घेण्यात येतील.  अधिकारी वर्ग विधान भवनाच्या कामकाजात अडकून पडतात त्यामुळे हा निर्णय घेतला, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलं. विधान भवानात उद्यापासून फक्त आमदार संबंधित अधिकारी यांनीच यावं, बाहेरच्या लोकांनी येवू नये, असं आवाहनही अजित पवार यांनी केलं.

पुण्यापाठोपाठ मुंबईतही आला 'कोरोना', 2 रुग्ण पॉझिटिव्ह

दरम्यान, मुंबईत कस्तुरबा रुग्णालयात (Kasturba hospital) कोरोना व्हायरसच्या संशयित रुग्णांना दाखल करण्यात आलं होतं. त्यापैकी  2 जणांना कोरोनाव्हायरस असल्याचं निदान झालं आहे. दोघांचेही रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेत.

दुबईहून प्रवास करून आलेले पुण्यातील 2 प्रवासी कोरोना बाधित आढळल्यानंतर त्यांच्या निकटसहवासितांचा शोध घेणे युद्धपातळीवर सुरू आहे. या रुग्णांची मुलगी तसंच ज्या ओला टॅक्सीने या रुग्णांनी मुंबई-पुणे प्रवास केला. टॅक्सी ड्रायव्हर आणि त्यांचा विमानातील सहप्रवासी हे तीन निकटसहवासित देखील कोरोना बाधित आढळले आणि आता या रुग्णांसोबतचे मुंबईतील 2 सहप्रवासीदेखील कोरोना बाधित असल्याचा निर्वाळा कस्तुरबा मध्यवर्ती प्रयोगशाळेने दिला आहे.

First published:

Tags: China, Corona virus, Japan