Home /News /news /

येत्या आठवड्यात मोठ्या शहरांमध्ये Corona उच्चांक येण्याची शक्यता, उच्चांकात मुंबई शहर?

येत्या आठवड्यात मोठ्या शहरांमध्ये Corona उच्चांक येण्याची शक्यता, उच्चांकात मुंबई शहर?

मोठ्या शहरांमध्ये कोरोना रुग्णांचा उच्चांक गाठेल असा अंदाज वर्तवला आहे. सध्या गेल्या वर्षी मे महिन्यानंनंतर देशात कोरोनाचा संसर्ग झपाट्यानं पसरत आहे.

  नवी दिल्ली, 14 जानेवारी: देशात कोरोना व्हायरसनं (Corona Virus) पुन्हा एकदा थैमान घातलं आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालली आहे. त्यातच तज्ज्ञांनी (Experts)पुढील आठवड्यापर्यंत दिल्ली आणि मुंबईसारख्या (Delhi and Mumbai) मोठ्या शहरांमध्ये कोरोना रुग्णांचा उच्चांक गाठेल असा अंदाज वर्तवला आहे. सध्या गेल्या वर्षी मे महिन्यानंनंतर देशात कोरोनाचा संसर्ग झपाट्यानं पसरत आहे. गुरुवारी देशात 2.47 लाखांहून अधिक नव्या रुग्णांची नोंद झाली. महिनाभरापूर्वी दररोज येणाऱ्या रुग्णांच्या तुलनेत ही संख्या दहापट आहे. ओमायक्रॉन व्हेरिएंट वेगाने डेल्टाची जागा घेत आहे. देशात आतापर्यंत 3.62 कोटी लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. संसर्गाच्या बाबतीत भारत सध्या अमेरिकेनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. हेही वाचा-  राज्यातील मंत्र्यांच्या बंगल्यांना आता गड-किल्ल्यांचे नाव, मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा' बंगल्याचंही नाव बदलणार?
   दिल्लीच्या अशोका विद्यापीठातील जीवशास्त्र आणि भौतिकशास्त्राचे प्राध्यापक गौतम मेनन म्हणाले की, आमचे मॉडेलिंग आणि इतरांच्या मॉडेलिंगवरून असे दिसून येतंय की भारतातील प्रमुख शहरांमध्ये 20 जानेवारीच्या आसपास कोरोनाची प्रकरणे शिगेला पोहोचण्याची शक्यता आहे. संपूर्ण भारतात, फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्याच्या सुरुवातीला रुग्णांची सर्वोच्च स्थिती दिसून येऊ शकते.
  मुंबई आणि दिल्लीत रेकॉर्ड ब्रेक रुग्णांचा आकडा गेल्या शुक्रवारी मुंबईत सर्वाधिक 20,971 संसर्गाची नोंद झाली होती. मात्र त्यानंतर रुग्णांची संख्या कमी होत आहे. शहराच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की संसर्गाचे प्रमाण कमी होत आहे. कोविड रुग्णालयांमध्ये जवळपास 80 टक्के बेड्स रिक्त आहेत. हेही वाचा-  आर्थर रोड जेलने अडवली अनिल देशमुखांची वाट, आयोगाने व्यक्त केला संशय
   दुसरीकडे, राष्ट्रीय राजधानी दिल्लीत गुरुवारी संध्याकाळी म्हणजेच गेल्या 24 तासांत कोरोनाचे 28,867 नवीन रुग्ण आढळले आहेत. या दरम्यान 22,121 लोक कोरोनामुक्त झालेत. कोरोनामुळे 31 जणांचा मृत्यू झाला आहे. येत्या काही दिवसांत येथे रोगाचा प्रादुर्भाव कमी होऊ शकेल, अशी आशा दिल्लीच्या आरोग्यमंत्र्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केलीय.
  Published by:Pooja Vichare
  First published:

  Tags: Corona virus in india, Coronavirus

  पुढील बातम्या