Corona व्हायरसचे जगभरात 85,000 पेक्षा जास्त संशयित, 2900 लोकांचा मृत्यू

Corona व्हायरसचे जगभरात 85,000 पेक्षा जास्त संशयित, 2900 लोकांचा मृत्यू

शनिवारी बीजिंगमध्ये प्रत्येक देशाच्या सरकारच्या आरोग्य विभागाने कोरोना व्हायरससंबंधी रुग्णांची आणि मृतांची आकडेवारी सादर केली.

  • Share this:

बीजिंग, 01 मार्च : चीनमध्ये (China) पसरलेल्या साथीच्या रोगाने संपूर्ण देशामध्ये रौद्र रुप धारण केलं आहे. कोरोना व्हायरसमुळे (Corona Virus) जगभरात 85,000 हून अधिक लोक संसर्गित झाले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने (World Health Organization) या संसर्गजन्य रोगाचं नाव कोविड -19 (Covid-19) ठेवलं आहे. यासाठी शनिवारी बीजिंगमध्ये प्रत्येक देशाच्या सरकारच्या आरोग्य विभागाने कोरोना  व्हायरससंबंधी रुग्णांची आणि मृतांची आकडेवारी सादर केली.

चीन मुख्यभूमि : 79,251 प्रकरणं आणि 2835 मृत्यू,  हाँगकाँग: 94 प्रकरणं आणि  2 मृत्यू,  मकाऊ: 10 प्रकरणं, दक्षिण कोरिया: 310 प्रकरणं, 17 मृत्यू,  जपान: डायमंड प्रिन्सेस क्रूझ जहाजातील 705 रुग्णांसह 941 प्रकरणं, 11 मृत्यू,  इटली: 888 प्रकरणं, 1मृत्यू,  इराण: 593 प्रकरणं, 43 मृत्यू,  सिंगापूर: 98 प्रकरणं,  अमेरिका: 62 प्रकरणं,  कुवेत: 45 प्रकरणं,  थायलंड:  42प्रकरणं,  बहरीन: 38 प्रकरणं,  तायवान: 39 प्रकरणं, एक मृत्यू,  ऑस्ट्रेलिया: 23 प्रकरणं,

मलेशिया: 24 प्रकरणं,  जर्मनी: 57 प्रकरणं,  फ्रान्स: 57 प्रकरणं, दोन मृत्यू,  स्पेन: 46 प्रकरणं,  व्हिएतनाम: 16 प्रकरणं,  ब्रिटेन: 23 प्रकरणे,  संयुक्त अरब अमिराती: 19 प्रकरणे,  कॅनडा: 14 प्रकरणे,  इराक: 8 प्रकरणे,  रशिया: 5 प्रकरणे,  स्वित्झर्लंड: 10 प्रकरणे,  ओमान: 6 प्रकरणे,  फिलिपिन्स: 3 प्रकरणे, एक मृत्यू,  भारत: 3 प्रकरणे,  क्रोएशिया: 6 प्रकरणे,  ग्रीस: 3 प्रकरणे,  इस्राईल: 5 प्रकरणे, लेबनॉन: 3 प्रकरणे,

पाकिस्तान: 4 प्रकरणे,  फिनलँड: 3 प्रकरणे,  ऑस्ट्रिया: 2 प्रकरणे,  स्वीडन: 12 प्रकरणे, इजिप्त: 1 प्रकरण,  अल्जेरिया: 1 प्रकरण,  अफगाणिस्तान: 1 प्रकरण,  उत्तर मॅसेडोनिया: 1 प्रकरण, जॉर्जिया: 2 प्रकरणे,  एस्टोनिया: 1 प्रकरण,  बेल्जियम: 1 प्रकरण,  नेदरलँड्स: 1 प्रकरण,  रोमानिया: 3 प्रकरणे,  नेपाळ: 1 प्रकरण,  श्रीलंका: 1 प्रकरण,  कंबोडिया: 1 प्रकरण,  नॉर्वे: 2 प्रकरणे,  डेन्मार्क: 2 प्रकरणे,  ब्राझील: 1 प्रकरण,  नायजेरिया: 1 प्रकरण,  अझरबैजान: 1 प्रकरण,  मोनाको: 1 प्रकरण,  कतार: 1 प्रकरण,  बेलारूस: 1 प्रकरण

संबंधित बातमी - कोरोनामुळे जगभरातील अब्जाधीशांचं कोट्यवधींचं नुकसान, सर्वसामान्यांनाही बसणार झळ

दरम्यान, कोरोना व्हायरसच्या संशयावरून महाराष्ट्रा (Maharashtra) च्या रुग्णालयांत स्वतंत्र सेवेत रुजू झालेल्या 105 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे, तर अन्य चार जणांवर अद्याप उपचार सुरू आहेत. राज्य सरकारने शनिवारी ही माहिती दिली. कोरोना विषाणूचा संशय असलेले दोघे जण मुंबईतील रुग्णालयात स्वतंत्रपणे उपचार घेत आहेत. एक पुण्यात आणि एक नाशिकमधील आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या म्हणण्यानुसार, राज्यात अद्याप कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचा एकही रुग्ण आढळलेला नाही.

सुमारे 60 हजार लोकांचा तपास लागला

18 जानेवारीपासून आतापर्यंत एकूण 59,654 प्रवाशांना कोरोना विषाणूची तपासणी करण्यात आली आहे. ते म्हणाले की, चीन, हाँगकाँग, थायलंड, सिंगापूर, दक्षिण कोरिया, जपान, नेपाळ, इंडोनेशिया, व्हिएतनाम, इटली आणि मलेशियासह कोरोना विषाणूमुळे पीडित देशांमधून आलेल्या सर्व प्रवाशांच्या 'कोविड -19' 'चा शोध घेण्यात येत आहे.

हे वाचा - फडणवीस आणि उद्धव ठाकरे एकत्र असलेला बॅनर होत आहे VIRAL, 'हे' आहे कारण

First published: March 1, 2020, 7:24 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading