Home /News /news /

नालासोपाऱ्यात सोशल डिस्टंसिंगचे तीनतेरा, गर्दीचा VIDEO पाहून भरेल कोरोनाची धडकी

नालासोपाऱ्यात सोशल डिस्टंसिंगचे तीनतेरा, गर्दीचा VIDEO पाहून भरेल कोरोनाची धडकी

आपली सुरक्षा सध्या घरात राहण्यात आणि गर्दी न करण्यात आहे हे माहित असून सुद्धा लोक नियमांना पायदळी तुडवतात. याचाच एक प्रकार नालासोपारामध्ये समोर आला आहे.

    नालासोपारा, 03 एप्रिल : देशात कोरोनाची दहशत वाढत चालली आहे. अशात सुरक्षेची पाऊल उचलत कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना 21 दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला. आपली सुरक्षा सध्या घरात राहण्यात आणि गर्दी न करण्यात आहे हे माहित असून सुद्धा लोक नियमांना पायदळी तुडवतात. याचाच एक प्रकार नालासोपारामध्ये समोर आला आहे. नालासोपारा येथे सोशल डिस्टंसचे तीनतेरा वाजले असून स्वस्तात धान्य मिळेल आणि रेशन दुकाने उघडली की जास्त सामान भरुन ठेवू या मानसिकतेने नालासोपारा मध्ये मोठी गर्दी केली आहे. नालासोपारातील एक व्हिडिओ व्हायरल होत असून ओम साई महिला बचत गट इथे लोकांनी खरेदी करता मोठी गर्दी केलेली पहायला मिळाली. धक्कादायक म्हणजे लोकं एकमेकांशी भांडतायेत, अंगावर जातायेत, कोणीही मास्क लावले नाही की हॅण्ड ग्लोज घातले नाही अशा परिस्थिती जर करोनाचा फैलाव दुर्दैवाने नालासोपाऱ्यात झाला तर त्याला जबाबदार कोण असेल? असा प्रश्न उपस्थित होतो. तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता लोकांनी कशा प्रकारे धान्य खरेदीसाठी गर्दी केली आहे. खरंतर ही गर्दी पाहून धडकी भरेल. आता नियम काही फक्त नालासोपाऱ्यातील नागरिकांनी नाही तर सगळीकडे हीच अवस्था आहे. सांगोला तालुक्यातील घेरडी इथे बैलगाडी आणि घोडागाडी शर्यत पार पडली. या शर्यतीवेळी अनेक लोक एकमेकांच्या संपर्कात आले. त्यामुळे कोरोनाचा धोका आणखी वाढण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातलेल्या घोडागाडी व बैलगाड्यांची शर्यत आयोजित केल्याप्रकरणी संयोजक संतोष नामदेव खांडेकर या घेरडी तालुका सांगोला यांच्यासह अज्ञात दहा बैलगाडी चालाकांवर सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, अनेक लोक घरी जाण्यासाठी जीवाची बाजी लावत नको तसा प्रवास करतात. असा प्रवास केल्याने आणि गर्दी केल्याने कोरोना होण्याची भीती जास्त आहे. त्यामुळे कुठेही बाहेर न जाता लांबचा प्रवास न करता घरात बसून कुटुंबाची काळजी घ्या असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    Tags: Corona, Symptoms of coronavirus

    पुढील बातम्या