औरंगाबादमध्ये पहिला कोरोना पॉझिटिव्ह, महाराष्ट्रात रुग्णांची संख्या 33 वर

राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या 33 वर पोहोचली असून औरंगाबादमध्ये पहिला रुग्ण आढळला आहे.

राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या 33 वर पोहोचली असून औरंगाबादमध्ये पहिला रुग्ण आढळला आहे.

  • Share this:
    औरंगाबाद, 15 मार्च : औरंगाबादमध्ये कोरोना बाधित रुग्ण आढळल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. औरंगाबादमधील 59 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाल्याचं निदान झालं आहे. ही महिला रशिया आणि कझाकिस्तानमधून प्रवास करून पुन्हा भारतात आली होती. या महिलेला अस्वस्थ वाटू लागल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. धूत रुग्णालयात या महिलेवर उपचार सुरू आहेत. या महिलेला कोरोनाची लागण झाल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. राज्यातल्या कोरोनाग्रस्तांची (covid-19) संख्या वाढली आहे. आता देशात सर्वाधिक coronavirus चे रुग्ण महाराष्ट्रात आहेत. मुंबई, नवी मुंबई आणि यवतमाळमध्येसोबतच आता औरंगाबादमध्येही रुग्ण सापडल्याने राज्यातल्या बाधितांची संख्या वाढली आहे.  महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या 33 वर पोहोचली आहे. कोरोना संदर्भात खबरदारीचा पर्याय म्हणून सगळ्या शाळा बंद करण्यात आल्या आहेत. यात राज्यातल्या सरकारी आणि खासगी सर्व शाळांचा समावेश आहे. येत्या 31 मार्चपर्यंत राज्यातील सर्व शाळा बंद राहतील, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी विधानसभेत सांगितलं. कुठल्या शहरात किती रुग्ण? पुणे - 16 नागपूर - 4 यवतमाळ - 2 ठाणे - 1 अहमदनगर - 1 कल्याण 1 पनवेल - 1 नवी मुंबई - 1 मुंबई - 5 औरंगाबाद - 1 दरम्यान, बुलडाणा जिल्ह्यात एका संशयित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याचे स्वॅब रिपोर्ट अद्याप प्रतीक्षेत आहेत.पूर्व आफ्रिकेत सापडलेला पहिला कोरोना रुग्ण मुंबईहून संसर्ग घेऊन गेला आहे.
    First published: