1 नोव्हेंबरपासून कोरोना लशीचं होणार वितरणं; निवडणुकीपूर्वी ट्रम्प प्रशासनाचा मास्टरस्ट्रोक

1 नोव्हेंबरपासून कोरोना लशीचं होणार वितरणं; निवडणुकीपूर्वी ट्रम्प प्रशासनाचा मास्टरस्ट्रोक

सध्या जगभरात कोरोनाचा कहर असून सर्वांनाच कोरोनाच्या लशीची प्रतीक्षा आहेत

  • Share this:

वॉशिंग्टन, 4 सप्टेंबर : सध्या जगभरात कोरोनाचा कहर सुरूच आहे. अशा परिस्थितीत सर्वांनाचा कोरोना लशीची प्रतीक्षा आहे. अमेरिकेच्या रोग नियंत्रण केंद्राचे संचालक रॉबर्ट रेडफिल्ड यांनी राज्यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात रोग नियंत्रण केंद्राद्वारे कोरोना लसीच्या वितरणाच्या कामात गती आणण्याचे आवाहन राज्यांना करण्यात आले आहे. 1 नोव्हेंबर 2020 पर्यंत लस देणारी केंद्र सुरु करण्यासाठी उपयायोजना करण्याच्या आग्रहाच्या सूचना या पत्राद्वारे देण्यात आल्या आहेत.

डोनाल्ड ट्रम्प सरकारने अमेरिकेतील सर्व राज्यांना 1 नोव्हेंबरपासून कोरोना व्हायरसची लस वितरीत करण्यासाठी तयार राहण्याचे निर्देश दिले आहेत. अमेरिकेतील रोग नियंत्रण केंद्राचे संचालक रेडफिल्ड यांनी 27 ऑगस्ट रोजी सर्व राज्यपालांना याबाबतचे पत्र लिहिले आहे. त्यात नजिकच्या भविष्यकाळात मेककॅसन कॉर्पोरेशनच्या वतीनं अनुमती पत्र मिळण्याचे संकेत देण्यात आले आहेत. या अनुमतीनंतर राज्यात, स्थानिक आरोग्य विभागातर्फे रुग्णालयांसह इतर अनेक ठिकाणी ही लस वितरीत केली जाणार आहे.

हे वाचा-LIVE : काश्मीरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, मेजर जखमी

सीडीसीकडून राज्यांना सहकार्याचे आवाहन

रेडफील्ड यांनी लिहिलेल्या पत्रात, या लसींचे वितरण करण्यासाठी राज्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन सीडीसीच्या वतीनं करण्यात आले आहे. आवश्यकतेनुसार 1 नोव्हेंबर 2020 पर्यंत लस वितरीत करणारी केंद्रं कार्यान्वित होतील, यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याचा आग्रह या पत्रातून करण्यात आला आहे.

हे वाचा-मोठी बातमी! रियाच्या घरी NCBचं सर्च ऑपरेशन सुरू, सॅम्युल मिरांडाला घेतलं ताब्यात

जगभरात सर्वाधिक मृत्यू अमेरिकेत

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव जगात सर्वाधिक अमेरिकेत पाहायला मिळाला आहे. आत्तापर्यंत कोरोनाचे 63 लाख रुग्ण अमेरिकेत आढळून आले असून, जगभरातील सर्वाधिक मृत्यूंची नोंदही अमेरिकेतच झालेली आहे. आत्तापर्यंत अमेरिकेत 1 लाख 90 हजार जणांना कोरोना संसर्गामुळे प्राण गमवावे लागले आहेत. कोरोनाला रोखण्यात आलेल्या अपयशामुळं डोनाल्ड ट्रम्प सरकार आणि प्रशासनाला मोठ्या टीकेलाही सामोरे जावे लागले आहे. अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष निवडणूक प्रचारात हा मुद्दा महत्त्वाचा ठरत असून, ट्रम्प यांचे विरोधक या मुद्द्यावर सरकारला घेरण्याचा प्रयत्न करीत आहेत.

Published by: Meenal Gangurde
First published: September 4, 2020, 8:14 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading