अखेर तो क्षण आला...! राज्यात कोणत्या जिल्ह्यांमध्ये कोव्हिशील्डचे किती डोस पोहोचले वाचा

अखेर तो क्षण आला...! राज्यात कोणत्या जिल्ह्यांमध्ये कोव्हिशील्डचे किती डोस पोहोचले वाचा

राज्यात 16 जानेवारीपासून लसीकरण मोहिमेला सुरुवात होणार असून त्यासाठी आता राज्य सरकारनं तयारी सुरू केली आहे.

  • Share this:

मुंबई, 13 जानेवारी: राज्यातील वेगवेगळ्या भागांमध्ये आज सीरम संस्थेच्या लशीचा पहिला साठा पोहोचला आहे. मुंबई, पुणे, नाशिकसह इतर वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यातील लसीकरणासाठी हा साठा सुरक्षितपणे पोहोचवण्यात आला आहे. राज्यात 16 जानेवारीपासून लसीकरण मोहिमेला सुरुवात होणार असून त्यासाठी आता राज्य सरकारनं तयारी सुरू केली आहे.

मुंबईमध्ये बुधवारी पहाटे 5.30 च्या सुमारास साधारण 1,39,500 डोस बृहन्मुंबई महानगरपालिकेला मिळाले असून ते मुंबई पोलिसांच्या सुरक्षेत पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमधून आणण्यात आले आहेत. हे डोस मुंबईतील विविध केंद्रावर पोहोचवण्यात येणार आहेत.

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीण परिसरात 111000 लसीचे डोस पोहोचले आहेत. दुसरीकडे नाशिक जिल्ह्यासाठी 43440 कोरोना डोसेस उपलब्ध झाले असून ही लस आज वितरीत केली जाणार आहे.

मंगळवारी रात्री उशिरा ही लस नाशिकमध्ये दाखल झाली असून नाशिक जिल्ह्यासह धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर या जिल्ह्यांना देखील ही लस नाशिक मधूनच रवाना केली जाणार आहे. नाशिक विभागाला 1 लाख 32 हजार कोविडच्या लसीचे डोस पोहोचले आहेत. अहमदनगर नगर 39290 धुळे 12430 जळगाव 24320 नंदुरबार 12410 तर नाशिक जिल्ह्याला मिळणार 43440 कोरोना लसीचे डोस नाशिक मधून कोरोनाची लस वेगवेगळ्या 5 जिल्ह्यात वितरण करण्यात येणार आहेत.

हे वाचा-युनिक हेल्थ आयडी काय आहे? कसा केला जातो या ID चा उपयोग

कोविशिल्ड लशीच्या एका डोसची किंमत साधारण 220 रुपये आहे. ही लस पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियानं (pune serum institute of india) ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि अॅस्ट्राझेनेका कंपनीच्या मदतीनं तयार केली आहे.

देशात 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरण मोहीम सुरू होणार आहे. पहिल्या टप्प्यात जवळपास 30 कोटी नागरिकांचं लसीकरण करण्याची केंद्र सरकारची योजना आहे. पहिल्या टप्प्यातील 3 कोटी लोकांना मोफत लस देण्यात येणार आहे. यामध्ये आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन वर्कर्सचा समावेश आहे. त्यानंतर 50 पेक्षा जास्त वयाच्या आणि इतर आजार असलेल्या 27 कोटी लोकांना लस दिली जाणार आहे.

First published: January 13, 2021, 1:10 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading