Home /News /news /

देशातल्या प्रत्येक नागरिकाला मिळणार कोरोनाची लस, पंतप्रधान नरेंद्र मोदीनी दिली माहिती

देशातल्या प्रत्येक नागरिकाला मिळणार कोरोनाची लस, पंतप्रधान नरेंद्र मोदीनी दिली माहिती

देशातील सर्व नागरिकांना कोरोनाची लस मिळणार असं आश्वासन आता पंतप्रधान मोदींनी दिलं आहे.

    नवी दिल्ली, 29 ऑक्टोबर : जगभरात कोरोनाचा विळखा अधिक घट्ट होत आहे. भारतातील रिकव्हरी रेट चांगला असलता तरीही जवळपास दिवसाला 50 हजाराच्या आसपास नवीन कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. कोरोनाच्या लशीकडे सर्वांचे डोळे लागले आहेत. बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्तेत आल्यावर भाजप सरकार मोफत लस देणार असं जाहीरनाम्यात सांगितल्यानंतर देशभरात हा कळीचा मुद्दा झाला आणि त्यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. देशातील सर्व नागरिकांना कोरोनाची लस मिळणार असं आश्वासन आता पंतप्रधान मोदींनी दिलं आहे. भारत बायोटेक आणि सीरम इन्स्टिट्यूटने तयार केलेल्या लशींची मानवी चाचणी सध्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात सुरू होत आहे. येत्या काही महिन्यांत ही लस बाजारात उपलब्ध होईल आणि टप्प्या-टप्प्यानं सर्व नागरिकांपर्यंत ही लस पोहोचवण्यात येईल. यासाठी विशेष योजना देखील तयार केल्या जात आहेत. इंग्रजी वृत्तपत्र इकॉनॉमिक टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान मोदी म्हणाले, "कोरोना साथीच्या काळात भारताच्या अर्थव्यवस्थेच्या प्रगतीच्या वेगात झालेल्या सुधारणात्मक पावलांमुळे संपूर्ण जगाचे लक्ष वेधले आहे." जगातील देश आता भारताच्या बाजारपेठेवर अवलंबून आहेत. अनेक देश भारतात गुंतवणूक करण्यासाठी तयार आहेत. योग्य वेळेत लॉकडाऊनचा निर्णय घेतल्यामुळे नागरिकांचे प्राण वाचू शकले. आता पुन्हा एकदा भारताची अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर येत आहे. 2024 पर्यंत ही अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन डॉलरवर नेण्याचं मोदी सरकारचं लक्ष्य आहे. हे वाचा-'या' देशात वाढतोय कोरोनाचा सर्वाधिक धोक, पुन्हा एकदा केली लॉकडाऊनची घोषणा काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी... -कोरोनाचा संसर्ग अजून संपलेला नाही. त्यामुळे ही वेळ सिस्टिम मजबूत करण्याची आहे. -कोरोनाच्या संसर्गाबाबत नागरिकांमध्ये सजगता निर्माण करायला हवी आणि मास्क, सॅनिटायझर आणि स्वच्छाता पाळणं खूप महत्त्वाचं आहे. -कृषी क्षेत्रात आणखीन काही नवीन बदल येत्या काळात पाहायला मिळणार आहेत. -कोरोनाची लस देशातील प्रत्येक नागरिकाला मिळणार असंही यावेळी मोदींनी सांगितलं
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Pm modi

    पुढील बातम्या