मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

खुशखबर! COVID-19 च्या नव्या प्रकारावरही परिणामकारक आहे ही लस?

खुशखबर! COVID-19 च्या नव्या प्रकारावरही परिणामकारक आहे ही लस?

ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि ॲस्ट्राझेनेका यांनी विकसित केलेली कोविड-19 (Corona Vaccine) लस वेगाने संसर्ग पसरवणाऱ्या नव्या कोरोनावर (Coronavirus Strain) प्रभावी ठरू शकते असं शास्रज्ञांना वाटतंय.

  • Published by:  Kranti Kanetkar

नवी दिल्ली,28 डिसेंबर: सध्या डिसेंबर महिना संपत आला आणि कोरोनामय झालेलं 2020 संपत आलं. लोकांना वाटत होतं वर्ष बदलतंय आयुष्यही बदलेल. पण अशाच वेळी ब्रिटनमध्ये कोरोनाच्या एका नव्या प्रकारच्या विषाणूमुळे होणारा संसर्ग शास्रज्ञांना लक्षात आला आणि सगळ्या जगाचे धाबे दणाणले. या नव्या कोरोनाचा संसर्ग इतका वेगाने वाढला आहे की पुन्हा संपूर्ण ब्रिटन लॉकडाउन झालं आहे. हा नवा प्रकार भारतात येईल अशीही शक्यता वर्तवली जात आहे. सध्या उपलब्ध लशी या प्रकारावर उपयुक्त ठरतील का अशी शंका सुरुवातीला शास्रज्ञांना होती पण आता काहीशी आश्वासक मतं व्यक्त होत आहेत.

ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि ॲस्ट्राझेनेका यांनी विकसित केलेली कोविड-19 (Corona Vaccine) लस वेगाने संसर्ग पसरवणाऱ्या नव्या कोरोनावर (Coronavirus Strain) प्रभावी ठरू शकते असं शास्रज्ञांना वाटतंय. ऑक्सफर्डची लस पुण्यातल्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) तयार करत असून गुरुवारपूर्वीच ती ब्रिटनमध्ये पोहोचेल. तिच्या वापराला लगेच परवानगी मिळेल आणि सर्वाधिक गरज असलेल्या लोकांना ती दिली जाईल अशी आशा आहे.

'दि संडे टाइम्स' ने दिलेल्या वृत्तात सरकारी ज्येष्ठ अधिकाऱ्याच्या हवाल्याने म्हटलंय की, ' ज्यांना कोरनाची लागण झाल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासेल अशा 1.2 ते 1.5 कोटी लोकांना लसीकरणासाठी प्राधान्य दिलं जाईल. ॲस्ट्राझेनेकच्या लशीला मंजुरी मिळाली असून मार्च महिन्यापर्यंत आम्ही लसीकरण करू शकू. '

हे वाचा-कुरापतखोर चीनला भारताचं चोख उत्तर, सरकारनं घेतला मोठा निर्णय!

कोरोनाच्या नव्या प्रकाराने (Covid-19 New Strain) आधीचा प्रकार मागे टाकत तो प्रचंड वेगाने ब्रिटनमध्ये पसरत आहे. सूत्रांनी म्हटलंय, ' नवे आकडे अचूक नाहीएत पण औषध व आरोग्य सेवा उत्पादन नियामक एजन्सी (एमएचआरए) या आठवड्यात ऑक्सफर्डच्या लसीला वापरासाठी परवानगी देईल.

ॲस्ट्राझेनेकाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पास्कल सोरियट म्हणाले, फायझर आणि मॉडर्नाच्या लशी जशा 95 टक्के प्रभावी ठरत आहेत तशीच आमची ॲस्ट्राझेनेकाची लसही तितकीच परिणामकारक ठरत आहे. त्यामुळे आम्हाला परवानगी मिळाली आहे. तब्येत खूप खालावलेल्या व्यक्तीसाठी आणि कोरोनाग्रस्ताला ही लस दिली तर त्याला रुग्णालयात दाकल करावं लागत नाही. त्याबाबत ती 100 टक्के उपयोगी आहे. आपली लस वेगाने संक्रमण पसरवणाऱ्या नव्या कोरोना विषाणूविरुद्धही आमची लस परिणामकारक ठरू शकते असंही ते म्हणाले.

First published: