अखेर तो क्षण आला! या 13 शहरांकरता पुण्याहून कोव्हिशिल्ड लसीचे डोस रवाना, पाहा VIDEO

अखेर तो क्षण आला! या 13 शहरांकरता पुण्याहून कोव्हिशिल्ड लसीचे डोस रवाना, पाहा VIDEO

16 जानेवारीपासून देशात लसीकरण मोहीम सुरू होणार आहे.

  • Share this:

पुणे, 12 जानेवारी: देशभरात आज सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. DCGI ने आपत्कालीन वापरासाठी मंजूर केलेल्या कोव्हिशिल्ड लस 16 जानेवारीपासून देण्यात येणार आहे. त्यासाठी आज सीरम संस्थेतून पहिले 3 कोल्ड स्टोरेज कंटेनर आज रवाना झाले आहेत. हे तीन कंटेनर पुणे विमानतळाच्या दिशेनं पोलिसांच्या कडक बंदोबस्तात 4 वाजून 55 मिनिटांनी रवाना झाले आहेत.

यापूर्वी इन्स्टिट्यूटच्या परिसरात कंटेनरची पूजा करण्यात आली. गणपती बाप्पा मोरया... च्या घोषणांनी परिसर दुमदुमला. कर्मचाऱ्यांनी कंटेनरसमोर नारळ फोडून या घोषणा देत पेढे वाटून आनंद साजरा केला. पुणे विमानतळावरून पहिले विमान दिल्लीसाठी सकाळी 8 वाजता रवाना होणार आहे. 8 फ्लाईटपैकी 2 फ्लाईट कारगो असून यातील कारगो फ्लाईट पैकी एक हैदराबाद, विजयवाडा आणि भुवनेश्वर, तर दुसरी कोलकता आणि गोवाहाटी येथे जाणार आहे. यावेळा पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे.

हे वाचा-Covisheild पेक्षा स्वस्त की महाग? स्वदेशी कोरोना लस Covaxin लशीची किंमत पाहा

16 जानेवारीपासून देशात लसीकरण मोहीम सुरू होण्यापूर्वी सीरम आणि भारत बायोटेक कंपनीच्या लशीला आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिल्यानंतर आता सरकारनं 6 कोटी डोसची ऑर्डर दिली होती. त्यापैकी पहिले कोव्हिशिल्ड लसीचे पहिले तीन कोल्ड स्टोरेज कंटेनर विमानतळाकडे रवाना झाले आहेत. ज्या क्षणाची वाट सर्वजण आतूरतेनं पाहात होते तो क्षण अखेर आला.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बायोटेकला 55 लाख डोसची ऑर्डर देण्यात आली आहे. ज्या किंमत साधारण 162 कोटी असल्याचं सांगितलं जात आहे. कोव्हिशिल्ड लसीचे 1.1 कोटी डोसची ऑर्डर खरेदी करण्याचा सूचना सरकारकडून सोमवारी देण्यात आल्या आहेत.

Published by: Kranti Kanetkar
First published: January 12, 2021, 7:23 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading