मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

BREAKING: राज्यात 24 तासांत 75 पोलिस झाले कोरोनाबाधित, 5 पोलिसांचा मृत्यू

BREAKING: राज्यात 24 तासांत 75 पोलिस झाले कोरोनाबाधित, 5 पोलिसांचा मृत्यू

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

राज्यभरातील पोलिस कोरोना विषाणूच्या विळख्यात सापडत आहेत. राज्यात एकूण 531 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे.

    मुंबई, 7 मे: राज्यभरातील पोलिस कोरोना विषाणूच्या विळख्यात सापडत आहेत. राज्यात गेल्या  24 तासांत 75 पोलिस कोरोनाबाधित झाले आहेत. आता कोरोनाबाधित पोलिसांची एकूण संख्या 531 झाली आहे. तर आतापर्यंत 5 पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.त्यात मुंबईत 3, पुण्यात 1 आणि सोलापुरात एकचा मृत्यू झाला आहे. मुंबईत 233 पोलिस कर्मचारी कोरोनाबाधित आहेत. त्यात सकारात्मक बाब म्हणजे 39 पोलिसांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यभरातील कोरोनाबाधित पोलिसांची संख्या तब्बल 531 वर पोहोचली आहे. यामध्ये 51 अधिकारी आणि 480 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. दक्षिण मुंबईतील एक आयपीएस अधिकारीही कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं आहे. हेही वाचा..तरुणांनाही लाजवेल असा निवृत्तीला आलेल्या एसटी कर्मचाऱ्याचा हा विक्रम! कोरोनाच्या संकटात आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांसह पोलिसही दिवसरात्र परिश्रम घेत आहेत. मात्र हेच पोलिस आता कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. अनेक पोलिसांना कोरोनाची लक्षणे दिसत आहेत. 51 अधिकारी आणि 480 कर्मचारी अशा एकूण 580 पोलिसांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसून आली आहेत. दुसरीकडे, एकूण 39 रुण बरे होऊन घरी परतले आहेत. तर दुर्दैवाने आतापर्यंत पाच पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यात मुंबईत 3, पुण्यात 1 आणि सोलापुरात एकचा मृत्यू झाला आहे. आधी काही डॉक्टरांनाही कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर मुंबईतल्या 53 पत्रकारांनाही कोरोनाने ग्रासलं असल्याचं उघड झालं होतं. दरम्यान, मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर तैनात API ला कोरोना सदृष्य लक्षणं दिसून आली आहेत. त्याची कोरोना चाचणी करण्यात आली असून त्याचा अहवाल अद्याप मिळालेला नाही. मात्र त्याला घरीच आयसोलेशनमध्ये राहायला सांगण्यात आलं आहे. तर इतर सर्व कर्मचाऱ्यांचीही तपासणी होण्याची शक्यता आहे. हेही वाचा.. .कोरोना योद्धांना सॅल्युट! एक वर्षाच्या चिमुरड्याला खेचून आणलं मृत्यूच्या दारातून दुसरीकडे, राजभवन, सह्याद्री गेस्ट हाऊस, मंत्रालय आणि इतर महत्त्वाच्या सर्व कार्यालयांमध्ये असलेल्या कर्मचाऱ्यांनाही काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या असून सॅनिटाजेशनचं काम सुरू आहे. मुंबईत काही ठिकाणी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून हायड्रोक्सीक्लोरोक्विनच्या गोळ्या देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच बरोबर राज्याच्या कोरोना उपचार रुग्णालयांमध्ये आता ऑक्सिजन स्टेशन करण्यावर भर देण्यात येत असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
    Published by:Sandip Parolekar
    First published:

    Tags: Coronavirus, Maharashtra police, Mumbai police

    पुढील बातम्या