कशासाठी फक्त आनंद लुटण्यासाठी? पाहा धनदांडग्यांची लोणावळ्यात कशी केली गर्दी

कशासाठी फक्त आनंद लुटण्यासाठी? पाहा धनदांडग्यांची लोणावळ्यात कशी केली गर्दी

लोणावळा तसंच खंडाळा येथील पर्यटन स्थळावर पर्यटकांना जाण्यास बंदी घालण्यात आली आहे.

  • Share this:

आनिस शेख, प्रतिनिधी

लोणावळा, 06 जुलै : कोरोना व्हायरसने राज्यात थैमान घातले आहे. सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळू नका, असं वारंवार सरकारकडून सांगितले जात आहे. पण, अशाही परिस्थिती पिकनिकचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक लोणावळ्यात गर्दी करत असल्याचं समोर आलं आहे.

लोणावळा तसंच खंडाळा येथील पर्यटन स्थळावर पर्यटकांना जाण्यास बंदी घालण्यात आली आहे.  असे असताना सुद्धा काही अतिउत्साही पर्यटक नियमांचे उल्लंघन करून लोणावळा आणि खंडाळा येथील पर्यटन स्थळावर दाखल होत आहेत. त्यामुळे पोलिसांनी आता कारवाईला सुरुवात केली आहे. लोणावळ्यात येणाऱ्या अशा पर्यटकांवर  पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे.

लोणावळा तसंच खंडाळा येथील पर्यटन स्थळावर जाणाऱ्या रस्त्यांवर पोलिसांनी चेक पोस्ट उभारून चोख बंदोबस्त लावलेला आहे.  त्यामुळे अशा अतिउत्साही पर्यटकांवर कारवाईचा बडगा उचलत  पोलिसांनी शनिवार तसेच रविवार या दोन दिवशी 58 पर्यटकांवर कारवाई केली आहे.

वयाच्या 80 वर्षी पत्नीसह बळीराजाची दुबार पेरणी, डोळ्यात पाणी आणणारा VIDEO

तर  मागील 15 दिवसात आतापर्यंत एकूण 131 पर्यटकांवर कारवाई करण्यात आलेली आहे. प्रशासनाने सर्वच पर्यटनस्थळावर बंदी घातली असल्याने यंदा सर्वच पर्यटन स्थळे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

त्यामुळे कोरोनाच्या परिस्थितीत पर्यटकांनी पर्यटन स्थळावर जावू नये, असं आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आलेले आहे.

संपादन -सचिन साळवे

Published by: sachin Salve
First published: July 6, 2020, 12:15 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading